‘पावनखिंड’ OTTवर का प्रदर्शित केला नाही; चिन्मय मांडलेकरच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Pawankhind चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) ओटीटीवर प्रदर्शित का केला नाही, याचं उत्तर एका व्हिडीओच्या मार्फत दिला आहे.

'पावनखिंड' OTTवर का प्रदर्शित केला नाही; चिन्मय मांडलेकरच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Chinmay Mandlekar in PawankhindImage Credit source: Instagram/ Chinmay Mandlekar
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:30 AM

‘स्पायडरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘अॅव्हेंजर्स’ अशा विविध हॉलिवूडपटांमधील सुपरहिरोजनी जगभरातील रसिकांना भुरळ घातली. प्राणांची बाजी लावून पराक्रम गाजवत इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झालेले खरे सुपरहिरो महाराष्ट्राच्या लाल मातीत होऊन गेले आहेत. हॉलिवूडपटांमधले सुपरहिरोज काल्पनिक आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अजरामर झालेले मावळे हे खरे आहेत. हे शूरवीर मावळेच खरे सुपरहिरो होते आणि आहेत. जिवाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रेरणादायी काम ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटानं केलं आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता. कोरोना महामारी आणि लॉकडाउनची परिस्थिती पाहता अनेक निर्मात्यांनी ओटीटीवर (OTT) चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र ‘पावनखिंड’ हा थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावा, अशी दिग्दर्शक आणि कलाकारांची होती. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) ओटीटीवर प्रदर्शित का केला नाही, याचं उत्तर एका व्हिडीओच्या मार्फत दिला आहे.

‘गेल्या दोन वर्षांत अनेकांनी विचारलं ‘पावनखिंड’ OTT वर का प्रदर्शित करत नाही?’ हे आहे त्याचं उत्तर. स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाच हवं पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजरं ही करायला हवं. प्रेक्षकहो तुम्ही ‘पावनखिंड’ साजरा करताय. आम्ही धन्य झालो,’ असं कॅप्शन देत चिन्मयने थिएटरमधील हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. थिएटरमध्ये जाऊन ‘पावनखिंड’ पाहणाऱ्या प्रेक्षकांनी शिवरायांची गाणी म्हणत हा आनंद साजरा केला आहे. पावनखिंड चित्रपटाची मोहिनीच अशी आहे की बघणारा प्रत्येकजण भारावल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

चिन्मयची पोस्ट- 

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हे तिसरं चित्रपट आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. या चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यात 15 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’ची यशस्वी घोडदौड; वीकेंडला कमावले तब्बल इतके कोटी रुपये

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

संबंधित बातम्या: ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.