AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sher Shivraj: ‘शेर शिवराज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; झी टॉकीजवर पहायला मिळणार अफझल खान वधाचा थरार

'शेर शिवराज' या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या सिनेमात घडत आहे.

Sher Shivraj: 'शेर शिवराज'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; झी टॉकीजवर पहायला मिळणार अफझल खान वधाचा थरार
Sher Shivraj: 'शेर शिवराज'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 8:25 AM

मराठीत काही काळापासून बरेच ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींच्या घरात दमदार कमाई करताना दिसतायत. ‘शिवराज अष्टक’ या मालिकेतील दिग्दर्शक दिगपाल लांजेकरांचा (Digpal Lanjekar) ‘शेर शिवराज- स्वारी अफझलखान’ (Sher Shivraj) हा चौथा सिनेमा. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका, संगीत सगळ्यालाच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले असले तरीही या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये दिसून येते. सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. रविवारी 14 ऑगस्टला दुपारी 12 वाजता ‘शेर शिवराज’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर (Zee Talkies) होणार आहे.

‘शेर शिवराज’ या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या सिनेमात घडत आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.

‘शेर शिवराज’ सिनेमात चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अफजलखानाच्या भूमिकेत मुकेश ऋषी दिसत आहेत. जिजाऊ आऊसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर सुभेदार तानाजी मालुसरे, दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक, वर्षा उसगांवकर बडी बेगम, समीर धर्माधिकारी कान्होजी जेधे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केसरच्या भूमिकेत तर अक्षय वाघमारे पिलाजी गोळे, विक्रम गायकवाड सरनोबत नेताजी पालकर, आस्ताद काळे विश्वास दिघे, वैभव मांगले शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ बोकील, सुश्रुत मंकणी येसाजी कंक, दीप्ती केतकर मातोश्री दिपाईआऊ बांदल, माधवी निमकर मातोश्री सोयराबाई राणीसरकार, ईशा केसकर मातोश्री सईबाई राणीसरकार, रिशी सक्सेना फाझल खानची तर निखील लांजेकर नरवीर जीवा महाले, तसेच बिपीन सुर्वे सर्जेराव जेधे यांच्या भूमिकेत आहेत.

हे सुद्धा वाचा

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....