रिलीज अगोदरच चित्रपटाची व्हिडीओ क्लिप व्हायरल, दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना भावनिक आवाहन!
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता विजयचा (Vijay) 'मास्टर' (Master) चित्रपट 13 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता विजयचा (Vijay) ‘मास्टर’ (Master) चित्रपट 13 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. पण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच चित्रपटाच्या काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामुळे आता चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपट रिलीज होऊपर्यंत त्या क्लिप कोणीही शेअर करू नये असे भावनिक आवाहन प्रेक्षकांना केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी ट्विट केले आहे की, मास्टर हा चित्रपट तयार करण्यासाठी आम्हाला तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागला आहे.(master movie director’s emotional appeal to the audience)
Dear all It’s been a 1.5 year long struggle to bring Master to u. All we have is hope that you’ll enjoy it in theatres. If u come across leaked clips from the movie, please don’t share it ?? Thank u all. Love u all. One more day and #Master is all yours.
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) January 11, 2021
त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि थिएटरमध्येच मास्टर हा चित्रपट बघायला तुम्हाला आवडेल. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कृपया आपल्याकडे आलेल्या व्हिडिओ क्लिप कोणाही शेअर करू नका. सुपरस्टार विजयचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे चाहते अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर बघायला उत्साही आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नाव नेहमीच चर्चेत असते. कतरिनाकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. मात्र, नुकताच कतरिनाला आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे. आता कतरिना साऊतचा स्टार अभिनेता विजय सेतुपतीसोबत काम करणार आहे. विजय सेतुपतीची साऊतमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि आता जेव्हा विजय आणि कतरिना एकत्र चित्रपटामध्ये दिसणार म्हटल्यावर तेव्हा मोठा धमाका होणार आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार श्रीराम राघवनच्या चित्रपटात विजय आणि कतरिना मुख्य भूमिकेत असतील.
संबंधित बातम्या :
रजनीकांतचं राजकारणात पाऊल नाहीच, माझ्यावर दबाव आणू नका, चाहत्यांना आवाहन!
New Project | सुपरस्टार विजयसोबत साऊतमध्ये एन्ट्री, कतरिना दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार!
(master movie director’s emotional appeal to the audience)