Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनला शोनंतर ‘या’ एका व्यक्तीशी ठेवायचं नाही कोणतंच नातं

हा शो जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने पहिल्यांदाच त्याच्या यशाचा मंत्र सांगितला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जिंकण्यामागची कारणं उलगडून सांगितली.

Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनला शोनंतर 'या' एका व्यक्तीशी ठेवायचं नाही कोणतंच नातं
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 3:35 PM

मुंबई: प्रसिद्ध रॅपर आणि परफॉर्मर एमसी स्टॅन याने ‘बिग बॉस 16’चं विजेतेपद जिंकत प्रेक्षकांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. हा शो जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने पहिल्यांदाच त्याच्या यशाचा मंत्र सांगितला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जिंकण्यामागची कारणं उलगडून सांगितली. “शोमध्ये मी खरा वागलो. मी जसा आहे तसाच राहिलो आणि विनाकारण कोणाशी भांडणं केली नाही. त्यामुळेच मला प्रेक्षकांना जोडून ठेवता आलं”, असं त्याने सांगितलं. ग्रँड फिनालेमध्ये प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भनोट, अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या पाच जणांमध्ये चुरस रंगली होती. त्यात रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारली.

उशिरा गेम कळला

बिग बॉसच्या सुरुवातीच्या एपिसोड्समध्ये एमसी स्टॅनला शो सोडून जायचं होतं. त्याविषयी बोलताना तो म्हणाला, “मला शोमध्ये घडत असलेल्या बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या. मी कधीच इतके कॅमेरे पाहिले नव्हते. बिग बॉसमध्ये सकाळी लोक का नाचतात आणि विचित्र पद्धतीने एखाद्या गोष्टीसाठी का लढतात, हेच मला कळत नव्हतं. मात्र हळूहळू मी पुढे जात होतो आणि माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केले.”

शिवसोबतची खास मैत्री

बिग बॉसच्या घरात स्टॅनची शिव ठाकरेसोबत खूप चांगली मैत्री झाली होती. “शिव आणि मी हे स्वप्न पाहिलं होतं की टॉप 2 मध्ये आम्हा दोघांना राहायचं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही सोबत राहिलो याचा मला आनंद आहे”, अशीही भावना त्याने व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसचा शो संपला असला तरी त्यातील स्पर्धकांची एकमेकांशी झालेली मैत्री कायम राहणार आहे. अब्दु रोझिक, साजिद खान, शिव ठाकरे, सुंबुल तौकिर खान आणि निमृत कौर यांच्या मी नेहमीच संपर्कात राहीन, असं स्टॅनने सांगितलं. मात्र बिग बॉसमधल्या एका व्यक्तीसोबत एमसी स्टॅनला कोणतंच नातं ठेवायचं नाही.

एका व्यक्तीशी कोणताच संपर्क ठेवणार नाही

“मला अर्चना गौतमशी कोणताच संपर्क ठेवायचा नाही. तिचा स्वभाव मिनिटा-मिनिटाला बदलतो. मंडलीशिवाय इतर कोणत्या स्पर्धकांशी माझा फारसा संपर्क येईल असं वाटत नाही”, असंही त्याने स्पष्ट केलं.

बिग बॉस 16 चा विजेता घोषित झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना एसमी स्टॅन म्हणाला, “मला मनापासून वाईट वाटलं. पण कदाचित हा शो व्यक्तिमत्त्वावर आधारित होता. त्याने त्याची बाजू लोकांना दाखवली आणि मी बाजू प्रेक्षकांसमोर ठेवली. खूप कमी अंतराने तो हरला, आता त्यावर मी तरी काय करू शकतो.”

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.