एकेकाळी सुष्मिता-ऐश्वर्याला दिली टक्कर; तीच अभिनेत्री आता बनली बौद्ध भिक्षु

ग्यालटेन सामटेन हे नाव तुम्ही ऐकलं नसलं तरी बरखा मदन हे नाव नक्कीच तुमच्या परिचयाचं असेल. अक्षय कुमार आणि रेखा यांच्या 'खिलाडीयों का खिलाडी' या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटातून बरखाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

एकेकाळी सुष्मिता-ऐश्वर्याला दिली टक्कर; तीच अभिनेत्री आता बनली बौद्ध भिक्षु
Barkha MadanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 8:43 AM

मुंबई : 5 फेब्रुवारी 2024 | ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमपासून सना खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आजवर धर्म किंवा अध्यात्मचा मार्ग स्वीकारण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्री सोडली. यापैकीच एक नवा म्हणजे बरखा मदन. बरखा एकेकाळी अत्यंत लोकप्रिय मॉडेल, ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री होती. मात्र बौद्ध भिक्षु बनण्यासाठी तिने कलाविश्व सोडलं. बरखाने तिचं नावही बदललं असून आता ती ग्यालटेन सामटेन (Gyalten Samten) म्हणून ओळखली जाते. बरखा मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय होती. तिने 1994 मध्ये ‘मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांना टक्कर दिली होती. त्यानंतर 1996 मधअये तिने ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये अक्षय कुमार, रेखा आणि रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका होत्या.

बरखाचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता, मात्र तरीही बरखाला प्रसिद्धी मिळण्यासाठी आणखी सात वर्षे लागली. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्मा यांच्या ‘भूत’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. चित्रपटांसोबतच तिने ‘न्याय’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ‘भूत’ या चित्रपटानंतरही बरखाला बॉलिवूडमध्ये काही खास ऑफर्स मिळत नव्हत्या. तेव्हा ती टेलिव्हिजनकडे वळली. 2005 ते 2009 या काळात तिने ‘सात फेरे- सलोनी का सफर’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं.

हे सुद्धा वाचा

2010 मध्ये बरखा निर्मितीकडे वळली आणि तिने ‘गोल्डन गेट एलएलसी’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या बॅनरअंतर्गत तिने ‘सोच लो’ आणि ‘सुर्खाब’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र 2012 मध्ये तिने या झगमगत्या विश्वाला कायमचा रामराम केला. दलाई लामा यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या बरखाने 2012 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर बौद्ध भिक्षु बनत तिने तिचं नावंही बदललं. बरखाने याविषयी सांगितलं होतं की, तिच्या आयुष्यात सर्वकाही ठीक चालू होतं. मात्र त्यात काहीतरी कमतरता असल्याची जाणीव तिला झाली. आईवडिलांना याविषयी सांगितल्यानंतर त्यांनीसुद्धा बरखाला पाठिंबा दिला.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.