रजनीकांत यांचा अल्पवयीन नातू अडचणीत, पोलिसांनी ठोठावला दंड, हेल्मेट आणि लायसन्सविना चालवत होता बाईक

मेगास्टार रजनीकांत यांचा नातू आणि अभिनेता धनुष याचा अल्पवयीन मुलगा यात्रा राजा याने हेल्मेट न घालता आणि लायसन्स नसतानाही सुपरबाईक चालवल्याने चेन्नई पोलिसांनी त्याला दंड ठोठावला

रजनीकांत यांचा अल्पवयीन नातू अडचणीत, पोलिसांनी ठोठावला दंड, हेल्मेट आणि लायसन्सविना चालवत होता बाईक
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 1:12 PM

चेन्नई | 20 नोव्हेंबर 2023 : मेगास्टार रजनीकांत यांचा नातू आणि अभिनेता धनुष याचा अल्पवयीन मुलगा यात्रा राजा हा अडचणीत सापडला आहे. अवघ्या 17 वर्षांच्या राजा याने हेल्मेट न घालता आणि लायसन्स नसतानाही सुपरबाईक चालवल्याने चेन्नई पोलिसांनी त्याला रोखले. ट्रॅफिकचे नियम मोडल्याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला 1000 रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांचा अल्पवयीन नातू, यात्रा हा चेन्नईच्या पोस गार्डन परिसरात एका गाईसह सुपरबाईक चालवताना दिसत आहे. मात्र त्यावेळी त्याने डोक्यावर हेल्मेट घातलेले नव्हते. या व्हिडीओमध्ये बाईकवर बसलेल्या मुलाच्या तोंडावर मास्क दिसत असला तरी ती धनुषचा मुलगा आणि रजनीकांत यांचा नातू यात्राच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची आई ऐश्वर्या रजनीकांत यांच्या माध्यमातून त्याची ओळख पटली. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी आहे.

दरम्यान गेल्या वर्षी , जानेवारी 2022 मध्ये, अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याने लग्नाच्या 18 वर्षानंतर वेगळे होण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ‘ 18 वर्षे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र, शुभचिंतक राहिलो आहे. आजपासून आम्ही आमच्या दोघांचा रस्ता वेगळा करत आहोत. आम्ही दोघांनी आमचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयाला समजून घ्या ‘असं दोघांनी म्हटलं होतं. धनुष आणि ऐश्वर्या यांना यात्रा (वय 17) आणि लिंगा ( वय 13)अशी दोन मुलं आहेत.

काही महिन्यांपूर्वी धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजा (Kasthoori Raja) यांनी मदुराईतील एका दाम्पत्याला कायदेशीर नोटीस बजावली होती. धनुष हा आमचा मुलगा आहे असा दावा या दाम्पत्याने केला होता. त्याच प्रकरणात धनुषचे वकील एस. हाजा मोहिदीन गिस्थी यांनी ही नोटीस पाठवली होती. धनुष आणि त्याच्या वडिलांनी संबंधित जोडप्याला प्रेस स्टेटमेंट जारी करण्यास सांगितलं होतं. प्रेस स्टेटमेंटमध्ये त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगावं लागेल आणि असे आरोप केल्याबद्दल माफी मागावी लागेल, असंही नमूद करण्यात आलं. त्यांनी तसं न केल्यास त्यांना 10 कोटींच्या मानहानीच्या खटल्याला (Defamation case) सामोरं जावं लागू शकतं, असंही त्या नोटीशीत लिहीण्यात आलं होतं.

धनुषचे आगामी प्रोजेक्ट्स

दरम्यान, धनुषच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटात दिसणार आहे. अरुण माथेस्वरन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी यापूर्वी ‘रॉकी’ आणि ‘सानी कायधाम’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटात धनुष याच्याशिवाय प्रियांका अरुल मोहन, शिवा राजकुमार, निवेदिता सतीश आणि संदीप किशन यांच्याही भूमिका आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.