Mika Singh: ..अन् मिका सिंगचा पारा चढला; पत्रकाराला केली शिवीगाळ

गायक मिका सिंग (Mika Singh) आणि ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राखी किंवा मिका हे एकमेकांना टोमणा मारण्याची किंवा उपरोधिक टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Mika Singh: ..अन् मिका सिंगचा पारा चढला; पत्रकाराला केली शिवीगाळ
Mika SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:32 AM

गायक मिका सिंग (Mika Singh) आणि ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राखी किंवा मिका हे एकमेकांना टोमणा मारण्याची किंवा उपरोधिक टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मिकाचा रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ (Swayamvar – Mika Di Vohti) असं या शोचं नाव असून यामध्ये तो त्याच्या वधूच्या शोधात आहे. याच शोच्या प्रमोशनसाठी मिकाने दिल्लीत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. मात्र या पत्रकार परिषदेत राखीबद्दल प्रश्न विचारताच त्याचा पारा चढला. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मिकाने या कार्यक्रमात एका वरिष्ठ पत्रकाराला शिवीगाळदेखील केली. इतकंच नव्हे तर, प्रश्नांची उत्तरं न देताच तो तिथून निघून गेला.

पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर एका पत्रकाराने मिकाला राखी सावंतबद्दल प्रश्न विचारला. स्वयंवर शोमध्ये राखीसुद्धा भाग घेणार आहे का, असा प्रश्न त्याला विचारला असता मिकाला राग अनावर झाला. माध्यमांसमोर काहीच उत्तर न देता तो तिथून निघून गेला. त्यानंतर राखीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला आणि शोच्या संपूर्ण टीमला एका रुममध्ये बोलावून मिकाने वाद घातला. “मिकाने पत्रकाराला शिवीगाळसुद्धा केली. राखीबद्दल प्रश्न विचारल्यामुळे त्याला राग आला. तिच्याशी माझी तुलनाच कशी होऊ शकते, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानंतर त्याने मुलाखत देण्यासही नकार दिला”, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

मिकाच्या शोचा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by STAR Bharat (@starbharat)

घडलेल्या प्रकारानंतर शोच्या टीमने पत्रकारांची माफी मागितली आणि रुममध्ये जे काही घडलं त्याबद्दल कोणाला काहीच कळू नये, याची विनंती केली. 2006 मध्ये मिका आणि राखीमधील वाद चांगलाच गाजला होता. माध्यमांसमोर मिकाने राखीला किस करताच तिने त्याच्या कानाखाली मारली होती.

हेही वाचा:

VIDEO: बायोपिक पाहून टेनिस क्रिकेटचा बाहशाह प्रवीण तांबेंच्या डोळ्यात आलं पाणी

VIDEO: अंकिता लोखंडेने दिली ‘गुड न्यूज’? कंगनाच्या शोमध्ये उघड केलं गुपित

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.