‘गाथा नवनाथांची’ मालिकेत मिलिंद शिंदे अनोख्या भूमिकेत

गुरुआई केवळ पाटलांच्या सांगण्यावरून बाल नागनाथांच्या मार्गात अडथळे घालतेय की आणखीसुद्धा काही रहस्ये त्यामागे दडली आहेत, यांचा उलगडा लवकरच होणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता 'गाथा नवनाथांची' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 01, 2023 | 7:21 PM
सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो. अलीकडेच बाल नागनाथांच्या भूमिकेत आरूष बेडेकरचा कमाल अभिनय प्रेक्षक अनुभवत आहेतच. त्यातच आता बाल नागनाथांना काटशह देण्यासाठी गुरुआईचा प्रवेश गावात झालेला पाहायला मिळतोय.

1 / 5
विशेष म्हणजे गुरुआई या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मालिकेत सध्या घमासान युद्ध परिस्थिती रंगली आहे. हे युद्ध बाल नागनाथ आणि गुरुआई यांमध्ये घडताना दिसतंय.

2 / 5
बाल नागनाथांनी गावाचे रक्षण तसेच उद्धार करण्याचा विडा उचललेला आहे. पण बाल नागनाथांचे समाजकार्य आणि गावकऱ्यांच्या मनामधील त्यांच्याविषयीची वाढत जाणारी आस्था, आपुलकी गावातील पाटलांच्या नजरेत खुपते आहे. बाल नागनाथांचा बंदोबस्त करण्यासाठी पाटील गुरुआईला बोलावणं धाडतात, पण बाल नागनाथ गुरुआईचा प्रत्येक वार निकामी करताना दिसताहेत.

3 / 5
पाटलांच्या सांगण्यावरून षडयंत्र रचणारे गुरुआई हे पात्र मिलिंद शिंदे या सुप्रसिद्ध अभिनेत्याने रंगवले आहे. बाल नागनाथ म्हणजेच आरूष बेडेकर आणि गुरुआई म्हणजेच अर्थात मिलिंद शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं खरोखरीच रंजक आहे.

4 / 5
मिलिंद शिंदेनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या आहेत, पण सध्या या मालिकेत त्यांनी साकारलेली गुरुआई ही भूमिका आणि त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. अंगावर हिरवीकंच साडी.. डोक्यावर पदर.. कपाळावर हळद कुंकवाचा भला मोठा टिळा आणि गळ्यात घातलेलं डोरलं.. नेमकं यातून काय निर्देशित करण्याचा प्रयत्न आहे, हे रहस्य लवकरच उलगडणार आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.