Mirzapur फेम गोलूसोबत इंटिमेट सीन, विजय वर्मा म्हणाला, ‘कुठे स्पर्श करायचा आणि कुठे…’

Mirzapur 3: 'कुठे स्पर्श करायचा आणि कुठे..., मर्यादेच्या बाहेर जावून...', 'मिर्झापूर' फेम गोलूसोबत विजय वर्माचे इंटिमेट सीन, अभिनेत्याकडून मोठा खुलासा..., ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय सीरिज 'मिर्झापूर 3' सध्या तुफान चर्चेत आहे...

Mirzapur फेम गोलूसोबत इंटिमेट सीन, विजय वर्मा म्हणाला, 'कुठे स्पर्श करायचा आणि कुठे...'
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 1:52 PM

अभिनेते पंकज त्रिपाठी, विजय वर्मा, अली फजल, अभिनेत्री रसिका दुगग्ल, श्वेता त्रिपाठी यांच्यामुळे ‘मिर्झापूर’ वेब सीरिज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. नुकताच सीरिजचा तिसरा सीझन देखील प्रदर्शित झाला आहे. ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, पण तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. सीरिजमध्ये असे अनेक सीन आहेत, जे चर्चेत आहेत. त्यातील एक म्हणजे विजय वर्मा आणि श्वेता त्रिपाठी यांच्यामध्ये असलेले इंटिमेट सीन…

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत विजय वर्मा याने श्वेता त्रिपाठी म्हणजे गोलू हिच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ही एका रोमँटिक मुलाची गोष्ट आहे जो एका मुलीवर जीवापाड प्रेम करतो. त्यानंतर त्या मुलासोबत जे काही होतं, त्यातून त्याला मोठी मदत मिळते. सीरिजमधील गोलूची भूमिका रंजक आहे. कारण प्रेमळ, साधी – भोळी मुलगी माझ्यासमोर येते, पण लोकं विसरली आहेत की पहिल्या सीझनमध्ये साधी – भोळी दिसणारी गोलू ग्रंथालयात एडल्ड मॅगझिन वाचताना दिसते…’

‘आपण आपल्या जोडीदाराकडून खूप काही शिकतो. असं नाही की तुम्ही स्वतःच सर्वकाही शिकण्यास सुरुवात करता. जेव्हा आपल्याला वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते आणि मुलापासून आपण एक माणूस बनतो.’ श्वेता हिच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनबद्दल विजय म्हणतो, ‘जेव्हा गोलू छोटे त्यागीला बेल्ड देते आणि म्हणते मारो… तेव्हा तो स्वतःला मारायला लागतो… मी स्वतः ही आयडिया दिग्दर्शकांना दिली होती. कारण जे पात्र आहे, त्यालाच कळत नाही की, तो काय करत आहे…’

‘मिर्झापूर 3’ मधील इंटिनेट सीनवर विजय वर्मा म्हणाला, ‘मिर्झापूर 3 च्या सेटवर एक इंटीमेसी दिग्दर्शक होता. इंटीमेसी दिग्दर्शक असल्यामुळे शूटच्या वेळी सेटवर संरक्षित वातावरण तयार केले जाते. जर तुम्ही इंटिमसी शूट करणं एखाद्या वर्कशॉपमधून शिकता, तर सेटवर शूट करायला तुम्हाला कठीण वाटत नाही. इंटिमेट सीन डान्स आणि इतर सीन प्रमाणेच असतात…’

‘कोणत्याही सीनसाठी एकसारख्या तयारीची गरज असते. शूट दरम्यान तुम्हाला समजावलं जातं की तुम्ही कुठे स्पर्श करू शकता आणि कुठे नाही. जिथे तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्यासाठी सुरक्षित काय आहे काय नाही. शिवाय मर्यादा देखील ठरवून दिल्या जातात. ज्यामुळे मर्यादेबाहेर कोणतीही गोष्ट होत नाही…’ असं देखील अभिनेत विजय वर्मा म्हणाला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.