‘ती मला सोडून तर गेलीच पण…’, अनेक वर्षांनंतर ब्रेकअपबद्दल मिथुन चक्रवर्ती व्यक्त झालेच
Mithun Chakraborty : ब्रेकअपनंतर 'ती' मिथुन चक्रवर्ती यांना अचानक ट्रेनमध्ये दिसली आणि..., ब्रेकअपनंतर कशी होती मिथुन यांची अवस्था... अनेक वर्षांनंतर सोडलं मौन...; सध्या सर्वत्र मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा... कोण होती 'ती' जिने सोडली अभिनेत्याची साथ

मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे आज सर्वकाही आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत मिथुन चक्रवर्ती यांचं नाव अव्वल स्थानी आहे. मिथुन दा यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. नुकताच मिथुन दा ‘सा रे गा मा पा’ शोच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या ब्रेकअपबद्दल मोठं वक्तव्य केलं. सध्या मिथुन दा यांनी सांगितलेल्या आठवणी तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मिथुन दा आणि त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंलगी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकअपनंतर मिथुन दा सुपरस्टार झाले.
ब्रेकअपनंतर ती मुलगी मिथुन दा यांना ट्रेनमध्ये भेटली होती. तेव्हा मिथुन दा एक्स-गर्लफ्रेंडला म्हणाले, ‘तू बरं झालं मला सोडलं. तुझ्यामुळे मी सुपरस्टार झालो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कठीण वेळ येते. मी मला आलेल्या अनुभवांवरुन सर्वकाही शिकलो आहे. प्रेम करणं, प्रेम होणं अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण प्रेमात आंधळं होणं फार वाईट गोष्ट आहे..’
‘माझ्या आयुष्यात प्रचंड वाईट वेळ आली होती. मी एका मुलीवर प्रचंड प्रेम करत होतो. पण ती मला सोडून निघून गेली. पण तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ती गेली पण मी सुपरस्टार झालो. एकदा अचानक ती मला ट्रेनमध्ये दिसली. तिने मला पाहिलं आणि ती लपली. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, तू मला सोडलंस चांगलं केलं…’
पुढे मिथुन दा म्हणाले, ‘माझ्याकडे देण्यासाठी काहीही नव्हतं. घर नव्हतं… पोट भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. तिला पश्चाताप झाला आणि ती ढसाढसा रडू लागली. तेव्हा मी तिला म्हणालो, आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे….’ सध्या सर्वत्र मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
इंडस्ट्रीमध्ये मिथुन चक्रवर्ती यांना अनेक वर्ष झाली आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मिथुन दा यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कामय उत्सुक असतात. मिथुन दा देखील कधी चाहत्यांना नाराज करत नाहीत. आज अनेक वर्षांनंतर देखील मिथुन दा यांच्या सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात.