मिथुन चक्रवर्तीला त्यांची मुलं ‘पप्पा’ म्हणत नाहीत, कारण…

मुंबई : सुपरडान्सर चॅप्टर 3 डान्स शोमध्ये रविवारी (19 मे) डान्सर म्हणून अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेस्ट म्हणून आले होते. मिथुन यांच्या स्वागतासाठी डान्स शोची थीम डिस्को डान्सर ठेवण्यात आली होती. यावेळी मिथुन यांनी लहान मुलांचा डान्स पाहिला. यासोबतच फिल्मी दुनियातील मजेदार किस्सेही मिथुन यांनी मुलांना सांगितले. मिथुन म्हणाले, “माझी मुलं मला, पप्पा-डॅडी असं काही बोलत […]

मिथुन चक्रवर्तीला त्यांची मुलं 'पप्पा' म्हणत नाहीत, कारण...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : सुपरडान्सर चॅप्टर 3 डान्स शोमध्ये रविवारी (19 मे) डान्सर म्हणून अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेस्ट म्हणून आले होते. मिथुन यांच्या स्वागतासाठी डान्स शोची थीम डिस्को डान्सर ठेवण्यात आली होती. यावेळी मिथुन यांनी लहान मुलांचा डान्स पाहिला. यासोबतच फिल्मी दुनियातील मजेदार किस्सेही मिथुन यांनी मुलांना सांगितले. मिथुन म्हणाले, “माझी मुलं मला, पप्पा-डॅडी असं काही बोलत नाहीत, ते मला मिथुन म्हणूनचं आवाज देतात”. हे ऐकून सर्वजण काही वेळासाठी थक्क झाले होते.

मी माझ्या पप्पांवर खूप प्रेम करतो. मी त्यांना नेहमी ब्रो म्हणून हाक मारतो, असं या शोमध्ये एका स्पर्धकाने म्हटलं होतं. हे ऐकल्यानंतर मिथुन म्हणाले की, “माझ्या घरीही असंचं आहे. मला तीन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे. चौघंही मला मिथुन बोलतात, पप्पा-डॅडी बोलत नाहीत”.

मिथुनची ही गोष्ट ऐकून शो मध्ये जज गीता कपूरने मिथुन यांना प्रश्न विचारला की, दादा असं का? यावर मिथुन म्हणाले, “जेव्हा मिमोहचा जन्म झाला तेव्हा चार वर्षापर्यंत त्याला बोलता येत नव्हते. तो फक्त एक-एक अक्षर बोलायचा. एक दिवस आम्ही त्याला मिथुन बोलायला सांगितले, आणि त्याने सहज माझं नावही घेतले. ही गोष्ट जेव्हा आम्ही मिमोहच्या डॉक्टरांना सांगितली. त्यांनीही म्हटलं हे खूप छान आहे. तुम्ही त्याला मिथुन बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या”.

“मिमोहच्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला मिथुन बोलण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. मिथुन बोलायला लागल्यानंतर कालांतराने तो सर्व बोलायला शिकला. शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतरही तो मला मिथुन या नावाने हाक मारायचा.  मिमोहनंतर त्याचे इतर भावंडही त्याच्याप्रमाणे मला मिथुन बोलायला लागले,असं मिथुन म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.