‘कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको’, मंदार देवस्थळी प्रकरणावरून अमेय खोपकरांचे आवाहन!

मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील मंदार देवस्थळी प्रकरणावरून अवघ्या मनोरंजन विश्वाची बाजू सावरून धरत, एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. (Ameya Khopkar mandar devasthali)

‘कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको’, मंदार देवस्थळी प्रकरणावरून अमेय खोपकरांचे आवाहन!
एकत्र येऊया आणि या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करुया.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 4:57 PM

मुंबई : कोरोनामुळे अवघे विश्व आर्थिक नुकसान सहन करत आहे. अशातच मनोरंजन विश्वालाही मोठी घरघर लागली आहे. या सगळ्यातच मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) हिने प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांनी मालिकेतील कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर यावर स्पष्टीकरण देताना मंदार देवस्थळी यांनी देखील आपली बाजू मांडली. कोरोना काळात आर्थिक नुकसानीमुळे या गोष्टीस विलंब झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी देखील मंदार देवस्थळी प्रकरणावरून अवघ्या मनोरंजन विश्वाची बाजू सावरून धरत, एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे (MNS Leader Ameya Khopkar reaction after mandar devasthali’s apology post).

कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको : अमेय खोपकर

‘कोरोनाकळात मनोरंजनविश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल मीडियावरुन त्याची जाहीर चर्चा करुन काही निष्पन्न होईल, याची शक्यता कमीच आहे. मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करुन काही साध्य होणार नाही. मंदारसारखेच इतरही बरेच टीव्ही निर्माते आर्थिक अडचणीत आहेत आणि त्याचा फटका कलाकार-तंत्रज्ञ सर्वांनाच बसतोय.

कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेलं नाही. अशा या काळात सामंजस्याने वागून मध्यम मार्ग कसा काढता येईल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. लवकरच मराठी टीव्ही निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि चॅनल अधिकारी यांच्याबरोबर ‘झूम’ बैठक करण्याची योजना आहे.

या परिस्थितीतून तोडगा काढता आला तर चांगलंच आहे, पण त्याहीपेक्षा एकत्र चर्चेनंतर गढूळ वातावरण जरी पूर्ववत झालं तरी पुरेसं आहे. कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको. एकत्र येऊया आणि या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करुया’, अशी पोस्ट करत अमेय खोपकर यांनी मनोरंजन विश्वात सक्रीय असणाऱ्या प्रत्येकालाच भावनिक आवाहन केले आहे (MNS Leader Ameya Khopkar reaction after mandar devasthali’s apology post).

कोरोनाकळात मनोरंजनविश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल…

Posted by Ameya Khopkar on Monday, 22 February 2021

(MNS Leader Ameya Khopkar reaction after mandar devasthali apology post)

काय म्हणाले मंदार देवस्थळी?

‘नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की, प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे, तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात, पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे, मला खूप लॉस झाला आहे, त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही, पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आत्ता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलंय. मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो’, अशी पोस्ट निर्माते मंदार देवस्थळी यांनी आपले स्पष्टीकरण देताना लिहिली आहे.

शर्मिष्ठा राऊतचा आरोप काय?

गेली 13 वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनेलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळीने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतं! प्लीज घाबरु नका, बोला.. please support & Pray for US.. #support # चळवळ” असे आवाहन शर्मिष्ठाने पोस्टच्या माध्यमातून केले होते.

शर्मिष्ठासोबतच ‘हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे.

(MNS Leader Ameya Khopkar reaction after mandar devasthali apology post)

हेही वाचा :

‘आभाळमाया’, ‘होणार सून…’ ते ‘मन बावरे’, मराठी मालिका विश्वात दबदबा, कोण आहेत मंदार देवस्थळी?

निर्मात्याच्या मनमानी कारभाराविरोधात कलाकार एकवटले!

आपल्याच मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, संग्राम समेळचा संतप्त सवाल

घाबरु नका, बोला, मंदार देवस्थळींनी पैसे थकवले, मराठी अभिनेत्रीचा गंभीर आरोप

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.