नशिबात जे असेल तेच… रस्त्यावर ज्यूस विकायचा, 25 लाख जिंकला, ‘त्या’ डिशेसमुळे लखपती
रस्त्यावर ज्यूस विकाणाऱ्या 24 वर्षीय मोहम्मद आशिक याचं चमकलं नशीब, 'त्या' डिशेसमुळे झाला लखपती... आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद आशिक याने मिळवलेल्या यशाची चर्चा...
मुंबई | 9 डिसेंबर 2023 : आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. ज्याचा आपण कधी विचार देखील करु शकत नाही.. असं काही झालं आहे रस्त्यावर ज्यूस विकाणाऱ्या 24 वर्षीय मोहम्मद आशिक याच्यासोबत… मंगळुरू याठिकाणी राहणाऱ्या मोहम्मद आशिक याने ‘मास्टरशेफ इंडिया 2’ च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरल आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद आशिक याची चर्चा रंगली आहे. मोहम्मद आशिक ‘मास्टरशेफ इंडिया 2’चा विजेता झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सांगायचं झालं तर, 8 डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रसारित झालेल्या ‘मास्टरशेफ इंडिया 2’ शोमध्ये 4 फायनलिस्टमध्ये अंतिम फेरी रंगली.
‘मास्टरशेफ इंडिया 2’ शोच्या फायलमध्ये फायनलिस्ट रुखसार सईद, मोहम्मद आशिक, नाम्बी जेसिका आणि सूरज थापा यांना परीक्षकांना त्यांची सिग्नेचर डिश बनवण्याचं आव्हान दिलं. सर्व स्पर्धकांना त्यांच्या आवडतीची डीश बनवण्यासाठी परीक्षकांनी 90 मिनिटं दिली होती. त्यानंतर परीक्षकांनी स्पर्धकांनी निकाल सुनावला…
View this post on Instagram
सर्वप्रथम सूरज थापा याने स्वतःची डीश परीक्षकांसमोर सादर केली. सूरज याने इंग्लिश ब्रेकफास्टची डिजर्ट डीश तयार केली. तिन्ही परीक्षकांना स्पर्धकाची डीश आवडली. परीक्षकांनी सूरज याचं कौतुक देखील केलं. सूरज याच्यानंतर रुखसार सईद हिने परीक्षकांसमोर स्वतःची डीश सादर केली.
रुखसार सईद हिने पूर्ण कश्मीरी डीश परीक्षकांसमोर ठेवली. रुखसारच्या डीशने परीक्षक विकास प्रचंड प्रभावित झाला, रणवीर म्हणाला, ही डीश कोणत्याही मिशेलिन रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये नक्कीच ठेवता येईल. एवढंच नाही तर, विकासने रुखसार हिला विसरलेल्या काश्मिरी पदार्थांवर पुस्तक लिहिण्याचा सल्ला दिला.
रुखसार हिच्यानंतर मोहम्मद आशिक याने परीक्षकांसमोर क्रॅब डीश सादर केली होती, जे पाहून विकास भावूक झाला. मोहम्मद आशिक बनवलेल्या पदार्थाचं कौतुक करत रणवीर म्हणाला, ‘लोक मला चुका शोधणारा मशीन म्हणतात. पण या डीश मला कोणतीही कमी भासली नाही..’ आशिक याने बनवलेल्या डीशचं देखील परीक्षकांनी कौतुक केलं.
मोहम्मद आशिक यांच्यानंतर नंबी जेसिका हिने तिने बनवलेली डीश परीक्षकांसमोर सादर केली. जेसिका हिने काळ्या तांदळापासून तयार करण्यात आलेली ‘स्क्वायर रूट’ डीश स्पर्धकांसमोर सादर केली. जेसिना हिने बनवलेला ‘स्क्वायर रूट’ पदार्थ देखील परीक्षकांना प्रचंड आवडला…
स्पर्धकांची डीश पाहिल्यानंतर परीक्षकांनी विजेत्याची घोषणा केली. परीक्षकांनी मोहम्मद आशिक याला ‘मास्टरशेफ इंडिया 2’ शोचा विजेता म्हणून घोषित केलं. मोहम्मद आशिक याला ‘मास्टरशेफ इंडिया 2’ शोची ट्रॉफी आणि 25 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले. सध्या सर्वत्र फक्त ‘मास्टरशेफ इंडिया 2’ आणि विजेता मोहम्मद आशिक यांची चर्चा रंगली आहे.