‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगनाविरोधात जोरदार आंदोलन, लोक म्हणाले परत जा, परत जा…!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वाद हे समिकरण नवीन नाही. कंगना जिथे जाते तिथे वाद निर्माण होतोच.

'धाकड' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगनाविरोधात जोरदार आंदोलन, लोक म्हणाले परत जा, परत जा...!
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 5:09 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वाद हे समिकरण नवीन नाही. कंगना जिथे जाते तिथे वाद निर्माण होतोच. कंगना सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड (Dhakad) चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला आहे. माध्यमांच्या रिपोटनुसार भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या. त्याची मागणी आहे की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहेत. (Movement against Kangana Ranaut during the shooting of Dhakad movie)

कंगनाने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे.

कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलावली चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. 30 लाख लोक फॉलो करत असल्याचे स्वत : कंगनाने सांगितले होते आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली होती. आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे.

संबंधित बातम्या : 

विरुष्काच्या घरी नन्ही परीचं आगमन, सोशल मीडियावर तैमूरच्या स्टारडमवर टीका, मिम्सची लाट!

Sandalwood Drugs Case | सँडल वुड ड्रग्जप्रकरणी मोठी कारवाई, विवेक ओबेरॉयच्या मेहुण्याला अटक

(Movement against Kangana Ranaut during the shooting of Dhakad movie)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.