Dobaara Movie Review: तापसीच्या ‘दोबारा’मध्ये सस्पेन्स-थ्रिलरचा डबल डोस; कथेतील ट्विस्ट वाढवणार उत्सुकता

सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'दोबारा' (Dobaara) 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये तापसीने मुख्य भूमिका साकारली आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित दोबारा हा चित्रपट स्पॅनिश चित्रपट मिराजचा हिंदी रिमेक आहे.

Dobaara Movie Review: तापसीच्या 'दोबारा'मध्ये सस्पेन्स-थ्रिलरचा डबल डोस; कथेतील ट्विस्ट वाढवणार उत्सुकता
Dobaara Movie Review: तापसीच्या 'दोबारा'मध्ये सस्पेन्स-थ्रिलरचा डबल डोसImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 5:46 PM

‘शाबाश मिठ्ठू’नंतर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदा आपल्या दमदार अंदाजात मोठ्या पडद्यावर परतली आहे. मिताली राजचा बायोपिक साकारल्यानंतर तापसीने आता थ्रिलर (Thriller) चित्रपटात भूमिका साकारली आहे. ही एक अशी भूमिका आहे, ज्याचा प्रेक्षकांनी विचारही केला नसेल. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘दोबारा’ (Dobaara) 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये तापसीने मुख्य भूमिका साकारली आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित दोबारा हा चित्रपट स्पॅनिश चित्रपट मिराजचा हिंदी रिमेक आहे. डार्क थीममध्ये बनलेल्या या चित्रपटात तापसीसोबत पावेल गुलाटीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

चित्रपटाची कथा

दोबारा या चित्रपटाची कथा पुण्यातील 1990 ते 2020 या कालावधीतील दाखवण्यात आली आहे. चित्रपटात अनय नावाचा 12 ते 13 वर्षांचा मुलगा आहे. त्याची आई एक वास्तुविशारद आहे, जी चित्रपटाच्या सुरुवातीला एका रुग्णालयाचं इंटेरिअर डिझाइन करत असते. यादरम्यान अनयला त्याच्या शेजारच्या घरात भांडण होत असल्याचं दिसतं. तो प्रथम त्याच्या आईला याबद्दल सांगतो. पण नंतर तो स्वतः शेजारच्या घरी जातो. घरात त्याला एका महिलेचा मृतदेह दिसतो. अनय घाबरून घरी पळतो. घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडतानाच अग्निशमन दलाची गाडी त्याला चिरडले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच अनयचा मृत्यू होतो.

चित्रपटात प्रत्येक वादळानंतर काही ना काही अनुचित घटना घडते. सुमारे 15 ते 20 मिनिटांच्या अंतरानंतर तापसीची एण्ट्री होते. चित्रपट आता 2021 च्या कालावधीकडे सरकतो. तापसी तिच्या टीव्हीवर तेच मूल पाहते, ज्याला अनेक वर्षांपूर्वी अग्निशमन दलाच्या वाहनाने चिरडून ठार केलं होतं. विशेष म्हणजे दोघंही एकमेकांशी टीव्हीवरूनच बोलतात. इतक्या वर्षांनंतर पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती होते. अनय पुन्हा शेजारच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळी तापसी त्याला वाचवते आणि इथूनच कथेतला ट्विस्ट सुरू होतो. थरार आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली आहे, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू असतो.

हे सुद्धा वाचा

कलाकारांचं अभिनय

चित्रपटात सर्वच पात्रांनी दमदार अभिनय केला आहे. पावेल गुलाटी, तापसी पन्नू आणि सास्वता चॅटर्जी यांनी आपली भूमिका सशक्तपणे साकारली आहे. तापसीने ज्या प्रकारे एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे, ते केवळ अप्रतिम आहे.

पहावा की पाहू नये?

या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. दोबारा बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की ठराविक शैलीच्या चित्रपटांना प्रेक्षकांसमोर आणावं. प्रेक्षकांना आपल्या विवेकबुद्धीनुसार ती कथा समजून घ्यावी लागेल. चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट बरेच आहेत, पण तुम्ही जर थ्रिलरचे शौकीन असाल तर ‘दोबारा’ चित्रपट नक्की पहा.

कलाकार: तापसी पन्नू, पावेल गुलाटी, नस्सर, राहुल भट्ट, हिमांशी चौधरी, सास्वता चॅटर्जी आणि निधी सिंग दिग्दर्शक: अनुराग कश्यप निर्माते: एकता कपूर, शोभा कपूर, सुनीर खेतरपाल प्रदर्शनाची तारीख: 19 ऑगस्ट रेटिंग : 3.5/5

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.