Minnal Murali Movie Review: जबरदस्त स्टोरीटेलिंग, शानदार अभिनय, केरळमधल्या खेड्यातला देसी सुपरहिरो मार्वेल-डीसीपेक्षा वरचढ

'मिन्नल मुरली' या चित्रपटात मार्वल आणि डीसीचे लेखक इतक्या वर्षांनंतरही जे करू शकले नाहीत, ते त्याच्या लेखकांनी करुन दाखवलं आहे.

Minnal Murali Movie Review: जबरदस्त स्टोरीटेलिंग, शानदार अभिनय, केरळमधल्या खेड्यातला देसी सुपरहिरो मार्वेल-डीसीपेक्षा वरचढ
Minnal Murali Movie Review
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:09 PM

सध्या देशात एका नव्या सुपहिरोची चर्चा आहे. या सुपरहिरोचं नाव आहे ‘मिन्नल मुरली’. मल्याळम चित्रपटातल्या या पहिल्या सुपरहिरोने थेट मार्वेल आणि डीसी फॅन्सच्या फेव्हरेट लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मल्याळी प्रेक्षकांसह देशभरातील इतर प्रेक्षकांचीदेखील वाहवा मिळवली आहे. आता सुपरहिरो म्हटल्यावर तो कसा असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हा सुपरहिरो विमानासारखा उडतो का, त्याच्याकडे थॉरच्या हतोडीसारखं किंवा कॅप्टन अमेरिकासारखी ढाल अशी काही शस्त्रं आहेत का? असा प्रश्नही तुम्हाला पडू शकतो. कारण सुपरहिरोची कॉन्सेप्ट ही परदेशातून किंवा हॉलिवूडमधून आली आहे, आणि तिथले सुपरहिरो असेच असतात. त्यामुळे असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच दिग्दर्शक बासिल जोसफचा ‘मिन्नल मुरली’ हा चित्रपट विदेशी पॉवर्स असलेल्या स्वदेशी सुपरहिरोवर बेतलेला आहे.

‘मिन्नल मुरली’ची मूळ कथाही बाकीच्या सुपरहिरोंपेक्षा फार वेगळी नाही. या सुपरहिरोचे खरे नाव जेसन (Tovino Thomas) आहे, त्याचे केरळमधील एका छोट्या गावात टेलरिंगचे दुकान आहे. जो अबिबास, पोमा कंपनीचे (ड्युप्लिकेट) टी-शर्ट घालतो आणि अॅडिडसला बनावट म्हणतो. त्याच्या घरात सलमानने आमिरचे पोस्टर लावले आहेत. सामान्य माणसासारखं आयुष्य आहे. पण एका रात्रीत त्याचं जग बदलतं. त्याच्यावर वीज पडते आणि तो बेशुद्ध होतो. या वीजेसह त्याला काही सुपरपॉवर्स मिळतात. परंतु पॉवर्स मिळाल्यानंतर त्यासोबत जबाबदाऱ्यादेखील आपोआप येतात. मुळात त्याच्यात सुपरपॉवर्स आल्या आहेत, हे कळण्यासाठीच बराच वेळ जातो. जेव्हा त्याला कळतं की त्याच्यात सुपरपॉवर्स आल्या आहेत, तेव्हा त्यांचा कसा उपयोग करायचा आणि त्याच्याविरोधात लढाईसाठी कोणता खलनायक मैदानात येणार ही या चित्रपटाची बेसिक कथा आहे.

या चित्रपटाच्या गोष्टीतला वेगळा अँगल म्हणजे यातला हिरो त्याच्यातल्या सुपरपॉवर्स दाखवून लोकांची वाहवा मिळवण्याऐवजी त्या लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. हीच बाजू या चित्रपटाला मार्वेल आणि डीसीपेक्षा वेगळा ठरवते. ‘मिन्नल मुरली’ मार्वल किंवा डीसी कॉमिक्स चित्रपटांसारखा शो-ऑफवाला सुपरहिरो नाही. जेसन हा येथे शिंपी म्हणून काम करणारा तरुण असून त्याला अमेरिकेत जाण्याची इच्छा आहे. त्याचा भाचा हा त्याच्या सुपरहिरोंच्या ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. वीज पडल्यामुळे त्याच्यात बदल होतात आणि त्याला हळूहळू समजते की त्याच्या हातात भीमाची शक्ती आहे आणि त्याच्या पायात हनुमानाची गती आहे. अनेक परदेशी कॉमिक्समध्ये या सुपरपॉवर्स असतातच त्यामुळे या बाबतीत चित्रपट फार वेगळा नाही. तर यात वेगळं काय आहे? तर ती म्हणजे कथेची मांडणी आणि दिग्दर्शन.

नेहमीची कथा पण मांडणी वेगळी

‘मिन्नल मुरली’ या चित्रपटात मार्वल आणि डीसीचे लेखक इतक्या वर्षांनंतरही जे करू शकले नाहीत, ते त्याच्या लेखकांनी करुन दाखवलं आहे. इथे नायक आणि खलनायक दोघेही सारखेच आहेत. दोघेही प्रेमाच्या शोधात आहेत. दोघांचाही सारखाच अपघात होतो. दोघांमध्ये एकच सुपरपॉवर आहे. फक्त, त्याचा वापर हा त्यांना नायक आणि खलनायक बनवतो. या चित्रपटात अतिशय सुंदर रीतीने प्रेक्षकांच्या मनात एक कल्पना हळूहळू रुजवली जाते. केवळ सत्ता मिळवून माणूस शक्तिशाली किंवा लोकप्रिय होत नाही, त्यासाठी जनतेची मनं जिंकणं आवश्यक आहे आणि तेही कोणत्याही प्रकारची नौटंकी, शो ऑफ न करता. यात एक प्रसंग आहे, ज्यात जेसन लॉकअपमध्ये बंद आहे पण पोलिसांनी त्याला सांगितल्यानंतरच तो लॉकअपचा दरवाजा तोडतो. अगदी सुपरहिरोच्या पोशाखातही तो तेव्हाच येतो जेव्हा जग त्याला त्याची ताकद दाखवायला सांगतं.

Minnal Murali (Photo : Twitter)

सुपरहिरो फिल्म असूनही सुरुवातीला चित्रपटाची कथा हळूहळू पुढे सरकते, पण तसे होत असताना चित्रपट कंटाळवाणा होत नाही. याचं श्रेय दिग्दर्शकाला द्यायला हवं. अनेक भारतीय चित्रपटांच्या कथेत नेहमीच दिसणाऱ्या हिरोच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटातही आहेत. बेरोजगार तरुण, रागीट दाजी (बहिणीचा नवरा), बिचारी (टाईप) बहीण, मामावर प्रेम करणारा भाचा, हिरोवर प्रेम करणाऱ्या हिरोईन्स आणि हिरो अनाथदेखील आहे. त्याला सांभाळणारी व्यक्ती त्याची कोणीच नाही हे पुढे हिरोला कळतं.

वेगळा खलनायक

या चित्रपटाची खासियत म्हणजे यातला खलनायक. गर्दीतला कोणताही एक चेहरा घ्या, तोच यातल्या खलनायकचा चेहरा आहे. Superhero ला साजेसा Supervillain यात आहे. खलनायक म्हणजे वाईट, दुष्ट, नराधम अशी एकंदरीत भारतीय चित्रपटकर्त्यांची आणि प्रेक्षकांची कन्सेप्ट आहे. मिन्नल मुरलीच्या दिग्दर्शकाने तसा खलनायक यात दाखवलेला नाही. Minnal Murali मधला खलनायकही प्रेक्षकांना आवडू शकतो. तो मरेपर्यंत (चित्रपट म्हटला की, खलनायकाचं मरण हे आलंच) आपल्याला त्याची बाजू फार चुकीची वाटत नाही. दिग्दर्शकाने नायक आणि खलनायक दोघांनाही जस्टीफाय करण्याचा प्रयत्न केला आहे.

Minnal Murali (Photo : Twitter)

आधी सांगितल्याप्रमाणे या चित्रपटातला नायक आणि खलनायक दोघांकडेही सारखीच शक्ती आहे. दोघांमधला फरक म्हणजे त्या शक्तीचा वापर. दोघं एकमेकांवर कुरघोडी करण्याचा अनेकदा प्रयत्न करतात आणि तो प्रवास या चित्रपटातला सर्वात स्ट्रॉंग पार्ट आहे. चित्रपटातले VFX जबरदस्त आहेत.

उत्कृष्ट अभिनय

‘मिनाल मुरली’ या चित्रपटाला त्यातील कलाकारांच्या अभिनयाने चार चांद लावले आहेत. अभिनेता टोविनो थॉमस त्याच्या दोन्ही रूपांमध्ये (जेसन आणि मिन्नल मुरली) चांगला वाटतो. टोविनोने जिथे गरज होती तिथे उत्तम अभिनय केला आहे. पण, गुरू सोमसुंदरम (Guru Somasundaram) यांनी ‘मिन्नल मुरली’ या चित्रपटातून त्याच्या अभिनयाचा खरा ग्राफ दाखवला आहे. 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा त्याची क्रश त्याला हो म्हणते तो प्रसंग पाहण्यासारखा आहे. बाकी फेमिना जॉर्ज, अजू वर्गीस, शेली किशोर, बैजू संतोष आणि हरिश्री अशोकन यांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

रटाळ संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी

‘मिनाल मुरली’ या चित्रपटात दिग्दर्शक बासिल जोसफ यांना त्यांच्या तांत्रिक टीमचीही चांगली मदत मिळाली आहे. चित्रपटाचे एडिटिंग ठिकठाक आहे. चित्रपटाचं संगीत लक्षात राहील इतकं काही खास नाही. चित्रपटाच्या छायांकनासाठी (सिनेमॅटोग्राफी) समीर ताहिरचं कौतुक करावं लागेल. सामान्य भारतीय जीवन अतिशय सुंदरपणे कॅमेऱ्यात कैद केलं आहे आणि सुपरहिरो चित्रपट असूनही शेवटच्या फ्रेमपर्यंत ग्लॅमरला कथेवर मात करू दिलेली नाही. चित्रपटाचे कला दिग्दर्शन आणि वेशभूषा देखील त्याच्या कथेला मदत करते. चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट वन टाईम वॉच नक्कीच आहे.

Minnal Murali (Photo : Facebook)

स्टार कास्ट : टोविनो थॉमस, गुरू सोमसुंदरम, फेमिना जॉर्ज, अजू वर्गीस, शेली किशोर, बैजू संतोष आणि हरिश्री अशोकन

दिग्दर्शक : बासिल जोसफ

कुठे पाहू शकता? : नेटफ्लिक्स

इतर बातम्या

Atrangi Re Review | सारा-धनुष-अक्षयची ‘चकाचक’ लव्हस्टोरी, वाचा कसा आहे ‘अंतरंगी रे’ चित्रपट…

Karnan : एका गावाच्या अस्तित्वाची लढाई, कलाकारांचा अफलातून अभिनय, मुक्या जनावरांद्वारे सामाजिक व्यवस्थेवर प्रश्न आणि बरंच काही…

(Minnal Murali Movie Review : Basil Joseph’s solid Direction, Tovino Thomasa and Guru Somasundaram’s best Performance)
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.