तू खूप मोठा झालास असं तुला वाटतं का? कपिल शर्मावर भडकला ‘शक्तीमान’

'शक्तीमान'ची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना हे पुन्हा एकदा कॉमेडियन कपिल शर्मावर भडकले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कपिलच्या शोमध्ये न जाण्यामागचं कारण सांगितलं आहे.

तू खूप मोठा झालास असं तुला वाटतं का? कपिल शर्मावर भडकला 'शक्तीमान'
Kapil Sharma and Mukesh KhannaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 11:04 AM

‘शक्तीमान’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना हे त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. विविध मुद्द्यांवर ते बेधडकपणे आपली मतं मांडतात. 2020 मध्ये त्यांनी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी कपिल शर्माच्या शोला ‘दर्जाहिन’ म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कपिलच्या शोमध्ये जाणं ते का टाळतात, याचं उत्तर त्यांनी दिलंय. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मुकेश यांनी सांगितलं की त्यांना कपिल शर्माचा शो अश्लीलतेमुळे आवडत नाही. मुकेश खन्ना म्हणाले, “मला अश्लीलतेच्या कारणामुळे बिग बॉस किंवा द कपिल शर्मा शो आवडत नाही. पण कपिल हा खूप चांगला एंटरटेनर आहे यात काही शंका नाही.”

या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी असे दोन किस्से सांगितले, ज्यानंतर त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. ते म्हणाले, “माझ्यासोबत दोन घटना घडल्या. मी असं म्हणणार नाही की त्यामुळे मी ‘अँटी कपिल’ (कपिलविरोधी) झालो पण मला त्याचा शो आवडला नाही. ती व्यक्ती कदाचित चांगली असेल पण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबल वाटत नाही. पहिला किस्सा हा कॉमेडी सर्कस या शोचा आहे. यामध्ये कपिलने शक्तीमानचा पोशाख परिधान केला होता. मला वाटत नाही की कपिलला त्याची चूक उमगली असेल, पण याबद्दल मी कृष्णा अभिषेकसोबत बोललो होतो. कॉमेडी सर्कसमध्ये ते स्किट्स सादर करायचे. त्यावेळी कपिलने केलेली चूक अशी होती की तो शक्तीमानच्या वेशात होता आणि त्याच्यासमोर एक मुलगी होती. तिच्या बाजूला एक बेड दाखवला होता. मी म्हटलं की, हा काय मूर्खपणा आहे. आम्ही शक्तीमानच्या भूमिकेला इतक्या चांगल्या पद्धतीने दाखवलं होतं आणि तुम्ही असं दाखवताय की तो व्यस्त असल्याने मुलीकडे जाऊ शकत नाही. नाहीतर शक्तीमानने त्या मुलीला पटवलं असतं. तुम्ही फक्त कॉमेडीसाठी हे सर्व करताय. मी कृष्णाकडे याचा जाब विचारला होता. तेव्हा कृष्णाने मला सांगितलं होतं की तो ही कॉमेडी करणार होता, पण कपिलने त्याच्याकडून ते स्वत:साठी घेतलं होतं.”

हे सुद्धा वाचा

“दुसरा प्रसंग हा एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. मी पहिल्या रांगेत बसलो होतो आणि त्यावेळी कपिलने इंडस्ट्रीत सुरुवातच केली होती. कपिल माझ्या बाजूला दहा ते वीस मिनिटं बसला होता, पण तो एकदाही माझ्याशी बोलायला आला नाही. त्याने फक्त पुरस्कार स्वीकारला आणि नंतर तिथून निघून गेला. या दोन घटना माझ्या डोक्यात कायम आहेत. म्हणून तो असंस्कृत असल्याचं मी म्हटलं होतं. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही खूप मोठे आहात? जेव्हा एखादी व्यक्ती अशी वागते, तेव्हा ती आदर गमावून बसते”, अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.