‘छावा’च्या एक दोन नव्हे, 1818 लिंक्स व्हायरल, सायबर पोलीस अॅक्शन मोडमध्ये, थेट मोठी कारवाई
'छावा' सिनेमाच्या १८१८ इंटरनेट लिंक्स तयार करून बेकायदेशीरपणे उपलब्ध करून देणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरातही या चित्रपटाने सर्वांना वेड लावले. आता हा चित्रपट इंटरनेटवर १८१८ लिंक्स तयार करून लिक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘छावा’ हा सिनेमा इंटरनेटवर अनधिकृतपणे व्हायरल केल्या प्रकरणी रजत राहुल हक्सर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ हा सिनेमा कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करून १८१८ इंटरनेट लिंक्स तयार करून बेकायदेशीरपणे उपलब्ध करून देण्यात आला. याचा परिणाम थिएटरमधील वितरणावर झाला आहे.
वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?




दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 316(2) आणि 308(3) अंतर्गत कॉपीराईट कायद्याच्या कलम 51, 63, आणि 65A सह सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 चे कलम 6AA (सुधारणा आणि तंत्रज्ञान अधिनियम 236 आणि माहिती 2360 च्या कलम 360) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
छावा सिनेमाविषयी
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.
चित्रपटाच्या कमाईविषयी
सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पाचव्या आठवड्यात ‘छावा’ने एकूण 22 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘छावा’ने ‘स्त्री 2’ (16 कोटी), ‘पुष्पा 2’ (हिंदीत 14 कोटी) यांना मागे टाकलं आहे. मात्र पाचव्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत बरीच घट पहायला मिळाली. कारण त्या तुलनेत पहिल्या आठवड्यात 24 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 18 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 7.75 कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात 5.25 कोटी रुपये इतकी कमाई झाली होती. या चित्रपटाने भारतात केवळ 23 दिवसांत कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 700 कोटींच्या पार आहे.