अमिताभ बच्चन – अनुष्का शर्माला मुंबई पोलिसांकडून नोटीस; ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात
दुसरीकडे एका व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही बाइकवर बसून डबिंग स्टुडिओला जाताना पहायला मिळतेय. स्टुडिओकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळलं होतं. त्यामुळे कारने न जाता तिने बाइकचा पर्याय निवडला होता. यावेळी दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बाईकप्रवास सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. बिग बींनी मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि सेटवर लवकर पोहोचण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली होती. त्याचा फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तर दुसरीकडे अनुष्कासुद्धा बाइकवर एका व्यक्तीच्या मागे बसून हेल्मेटशिवाय प्रवास करताना दिसली. नेटकऱ्यांनी हेल्मेटचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी दोघांनाही नोटीस बजावली आहे.
अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्माच्या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी हेल्मेटवरून प्रश्न उपस्थित केला. इतकंच नव्हे तर काहींनी कमेंटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत त्यांच्याकडे तक्रार केली. यावर मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं, ‘आम्ही ट्रॅफिक शाखेला याबद्दलची माहिती दिली आहे.’ त्याचप्रमाणे त्यांनी दोन्ही कलाकारांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या बिग बींनी रस्त्यावर एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे मदत मागितली होती. त्या व्यक्तीच्या बाइकवर बसून ते सेटवर वेळेत पोहोचले. याचा फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ते त्या व्यक्तीच्या बाइकच्या मागे बसलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळख नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून तू तुझं काम जलदगतीने केलंस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’
View this post on Instagram
बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. यावर अनेकांनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही का, असाही सवाल नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना केला होता.
View this post on Instagram
दुसरीकडे एका व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही बाइकवर बसून डबिंग स्टुडिओला जाताना पहायला मिळतेय. स्टुडिओकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळलं होतं. त्यामुळे कारने न जाता तिने बाइकचा पर्याय निवडला होता. यावेळी दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं.