प्रचंड डिप्रेशनमध्ये होते, स्वत:ला मारून घ्यायचे…; उर्मिला निंबाळकरच्या डोळ्यात पाणी
Urmila Nimbalkar Video on Depression Actor to Marathi Youtuber Journey : डिप्रेशन ते प्रचंड यश... उर्मिला निंबाळकरचा अभिनेत्री ते युट्यूबर प्रवास, तुम्हालाही कधी डिप्रेशन आलं असेल तर उर्मिलाचा प्रवास तुम्हाला प्रेरणा देईल. उर्मिला नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर...
मुंबई | 19 मार्च 2024 : प्रत्येकाच्या आयुष्यात बरा- वाईट काळ येत असतो. त्यामुळे आपण अनेकदा खचून जातो. आता आपलं काहीही होऊ शकत नाही. असा विचार मनात येतो. आपण खचून जातो. पण अशावेळी स्वत:ला सावरत पुढे जाणं आवश्यक असतं. पण अनेकजण डिप्रेशनचे शिकार होतात. पण त्यातून बाहेर पडून आपण यश मिळवू शकतो, हे उर्मिला निंबाळकरकडे पाहिलं की जाणवतं… अभिनेत्री असणारी उर्मिला निंबाळकर आता प्रसिद्ध युट्यूबर आहे. पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता. तिने अनेक चढउतारांमधून जावून हे यश मिळवलं आहे.
मालिकेतून काढलं अन्…
एका मालिकेतून काढून टाकल्यानंतर उर्मिला प्रचंड डिप्रेशनमध्ये गेली. ती एकाच ठिकाणी बसून राहायची. कोणत्याच कामात तिचं मन लागायचं नाही. ती अनेकदा स्वत: ला मारून घ्यायची. गाल लाल होईपर्यंत तिने स्वत: ला मारून घेतलं. तो काळ उर्मिलासाठी प्रचंड कठीण होता. प्रचंड डिप्रेशनच्या काळातून ती गेली. पण आज तिनं जे यश मिळवलं ते सगळ्यांना प्रेरणा देतं.
डिप्रेशनमधून कशी बाहेर पडली?
एकेकाळी मालिकेतून काढून टाकलं. त्याचं टेन्शन असताना निगेटिव्ही मनात असताना उर्मिलाने यूट्यूब बघायला सुरुवात केली. प्रचंड पॉझिटिव्ह व्हीडिओ ती बघू लागली. त्यातून निगेटिव्ह विचार करायला तिने स्वत:ला वेळ दिला नाही. प्रचंड पॉझिटिव्ह गोष्टी तिने ऐकल्या अन् ती डिप्रेशनमधून बाहेर पडली. आज ती प्रसिद्ध यूट्यूबर आहे.
पॉझिटिव्ह राहा
या डिप्रेशनमधून बाहेर पडल्यानंतर उर्मिलाने स्वत:वर प्रचंड काम केलं. अभिनेत्री असणारी उर्मिला आता प्रसिद्ध युट्यूबर आहे. काहीही झालं तरी खचायचं नाही. त्यातून पुन्हा नव्याने उभं राहायचं या जगात प्रचंड पॉझिटिव्ही आहे. चांगले लोक आहेत. त्यांच्याशी बोलत राहायचं आणि प्रचंड आनंदी आणि समाधानी राहायचं असं उर्मिला सांगते.
उर्मिला लाईफस्टाईलशी संबंधित व्हीडिओ करते. स्किनकेअर आणि मेकअपच्या तिच्या व्हीडिओंना नेटकरी पसंती देतात. तिचे यूट्यूबवर एक मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तिने नुकतंच डायरी लाँच केली. त्यामुळे ती बिझनेसमध्ये सुद्धा सध्या उतरलेली आहे.