Samantha | समंथाचा रोमान्स पाहून पूर्व पतीची थिएटरमधून एक्झिट? चर्चांवर नाग चैतन्यने सोडलं मौन

समंथा आणि नाग चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या चार वर्षातच विभक्त होत त्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर समंथा तिच्या करिअरवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसतेय.

Samantha | समंथाचा रोमान्स पाहून पूर्व पतीची थिएटरमधून एक्झिट? चर्चांवर नाग चैतन्यने सोडलं मौन
Samantha and Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 8:42 AM

हैदराबाद | 29 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि नाग चैतन्य हे विभक्त झाले असले तरी नेहमी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. घटस्फोटानंतरही नाग चैतन्यचं समंथावर प्रेम असल्याचं वृत्त नुकतंच व्हायरल झालं होतं. त्यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. नाग चैतन्यने नुकतीच एका चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. त्याने या चित्रपटाचा मध्यांतरापर्यंतचा भाग पाहिला. मात्र इंटरवलदरम्यान जेव्हा समंथाच्या आगामी ‘कुशी’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला, तेव्हा तो थेट थिएटरमधून बाहेर पडल्याचं म्हटलं गेलं. ‘कुशी’ या चित्रपटात समंथाने अभिनेता विजय देवरकोंडासोबत काम केलं आहे. यामध्ये दोघांचे बरेच रोमँटिक सीन्स आहेत. आपल्या पूर्वी पत्नीचे दुसऱ्या हिरोसोबत रोमँटिक सीन्स पाहू न शकल्याने नाग चैतन्यने थिएटरमधून काढता पाय घेतला, अशी चर्चा सुरू झाली होती.

काय म्हणाला नाग चैतन्य?

“ही फालतूची चर्चा आहे. काही तेलुगू वेबसाईट्सने ही अफवा पसरवली आहे. याबद्दल मी त्यांना आधीच स्पष्ट केलं आहे,” अशी प्रतिक्रिया नाग चैतन्यने दिली. तर दुसरीकडे समंथाच्या कुशी या चित्रपटाच्या पिआर टीमकडून प्रसिद्धीसाठी अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप नाग चैतन्यच्या टीमकडून केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

समंथा आणि नाग चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या चार वर्षातच विभक्त होत त्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर समंथा तिच्या करिअरवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसतेय. तर दुसरीकडे नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत जोडलं जात आहे.

समंथासाठी ‘कुशी’ हा चित्रपट खूपच खास आहे. कारण या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने करिअरमध्ये काही काळ ब्रेक घेतला आहे. गेल्या वर्षी तिला मायोसिटीस या आजाराचं निदान झालं. त्याच्या उपचारासाठी आणि आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे.

समंथासोबतच्या घटस्फोटाबद्दल नाग चैतन्य एका मुलाखतीत म्हणाला होता, “आम्ही गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहोत आणि वर्षभरापूर्वी घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली. कोर्टाची सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहोत. मला माझ्या आयुष्यातील त्या टप्प्याबद्दल खूप आदर आहे. ती व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे.”

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.