Samantha | समंथाशी घटस्फोटानंतर नाग चैतन्यला ‘या’ गोष्टीचा मोठा पश्चात्ताप; स्वत:च केला खुलासा

घटस्फोटानंतर समंथा आणि नाग चैतन्य आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. एकीकडे नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभित धुलिपालाला डेट करत असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे समंथाने घटस्फोटानंतर एकटंच राहणं पसंत केलंय.

Samantha | समंथाशी घटस्फोटानंतर नाग चैतन्यला 'या' गोष्टीचा मोठा पश्चात्ताप; स्वत:च केला खुलासा
Samantha and Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 8:15 AM

हैदराबाद : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांचा घटस्फोट हा केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय ठरला. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. समंथा तिच्या या निर्णयाविषयी अनेकदा मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर व्यक्त झाली. मात्र नाग चैतन्य त्याच्या खासगी आयुष्याविषयी माध्यमांसमोर कधीच मोकळेपणे व्यक्त झाला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील पश्चात्तापाविषयी वक्तव्य केलं आहे.

नाग चैतन्यला कोणत्या गोष्टीचा पश्चात्ताप आहे?

तुझ्या आयुष्यातील असा कोणता निर्णय आहे, ज्याचा तुला आजही पश्चात्ताप होतो, असा प्रश्न त्याला नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना नाग चैतन्य म्हणाला की त्याला त्याच्या आयुष्यातील कोणत्याच निर्णयाबद्दल किंवा गोष्टीबद्दल पश्चात्ताप नाही. फक्त त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, असं त्याने सांगितलं. चित्रपटांच्या निवडीविषयी तो पुढे म्हणाला, “कदाचित मी चित्रपटांच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेतला नाही. असे दोन-तीन चित्रपट आहेत, जे निवडताना मी नीट विचार केला नाही. मात्र तीसुद्धा माझ्यासाठी एक शिकवणच होती.”

‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय नाग चैतन्य?

समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं जातंय. काही दिवसांपूर्वी या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये चैतन्य हा एका रेस्टॉरंटमधल्या शेफसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसला. तर त्याच्या मागील टेबलवर सोभिता बसलेली पहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा

लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट

नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभूने ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट जाहीर केला. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली.

“ती गोष्ट कधीच विसरू इच्छित नाही”

घटस्फोटानंतर समंथा आणि नाग चैतन्य आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. एकीकडे नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभित धुलिपालाला डेट करत असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे समंथाने घटस्फोटानंतर एकटंच राहणं पसंत केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबाबत कोणतीच गोष्ट विसरणार नाही, असं म्हटलंय. या मुलाखतीत समंथाला विचारण्यात आलं होतं, की तिच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का, जी ती कधीच विसरू इच्छित नाही? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी समंथाने विचारलं की हा प्रश्न तिच्या रिलेशनशिपबाबत आहे का? त्यानंतर ती म्हणाली की या प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे ती अडचणीत येऊ शकते. मात्र तरीसुद्धा समंथा उत्तर देत म्हणते, “मला काहीच विसरायचं नाही. कारण प्रत्येक गोष्टीने मला काहीतरी शिकवलंय. त्यामुळे मला कोणतीच गोष्ट विसरायची नाही.”

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.