शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज; ‘छावा’मध्ये औरंगजेबाला ठणकावून सांगणारा तो बालकलाकार कोण?
'छावा' सिनेमामध्ये शंभूराजेंच्या भूमिकेत दिसणाऱ्या बालकलाकाराची सध्या चर्चा सुरु आहे. हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘छावा’ हा सिनेमा सध्या चांगलाच गाजत आहे. १४ फ्रेबुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या सात दिवसात चित्रपटाने जगभरात जवळपास २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, चित्रपटात औरंगजेबाच्या नजरेला नजर देणारा ‘बाल संभाजी’ काही मिनिटांसाठी दाखवण्यात आला होता. पण हा चिमुकला नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
‘छावा’ सिनेमातील एक क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या बालकलाकाराचे नाव अभिनव साळुंखे आहे. या अभिनवने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे लहानपणापासूनच निडर होते हे छावा सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.




View this post on Instagram
काय आहे व्हिडीओ?
‘छावा’ चित्रपटातील एका सीनमध्ये या बालकलाकाराने सीन केला आहे. या सीनमध्ये भर दरबारात ‘शिवाजी नही आया?’ असे औरंगजेब विचारत असतो. तेवढ्यात बाल संभाजींची एण्ट्री होते. ते म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज.’ त्यावर औरंगजेब गंमतीने त्यांना विचारतो की, ‘आपको बुखार नही आता?’ त्यावर बाल संभाजी उत्तर देतात की, ‘हमाजी वजह से औरोको बुखार आता है.’ हा काही मिनिटांचा सीन मनाला चांगलाच भिडणारा आहे.
कोण आहे हा बालकलाकार?
‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज्यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा अभिनव साळुंखे हा मुंबईचा आहे. तो आठ वर्षांचा आहे.