आरक्षणावर बोललो तर बोंबाबोंब होईल, मराठा आरक्षणावर विचारताच नाना पाटेकर यांचं थेट उत्तर; असं का म्हणाले नाना?

अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत. यावेळी ते राजकारण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही व्यक्त झाले. मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका काय, हे नानांनी सांगितलं.

आरक्षणावर बोललो तर बोंबाबोंब होईल, मराठा आरक्षणावर विचारताच नाना पाटेकर यांचं थेट उत्तर; असं का म्हणाले नाना?
नाना पाटेकर
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 3:22 PM

मुंबई : 11 जानेवारी 2024 | राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे मनोज जरांगे पाटील हे आजवर अनेकदा उपोषणाला बसले. काही ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजवर अनेकांनी आपली मतं स्पष्टपणे मांडली आहेत. राजकीय क्षेत्रापासून कलाविश्वातील मंडळीही त्यावर मोकळेपणे व्यक्त झाले. आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडली आहे. आरक्षणाबाबत माझी मतं फार पराकोटीची आहेत, असं ते म्हणाले आहेत.

आरक्षणाविषयी काय म्हणाले

आरक्षणाविषयी तुमचं काय मत आहे, असा प्रश्न विचारल्यावर नाना म्हणाले, “मला माहीत नाही. आरक्षणासंदर्भात मी टिप्पणी करू नये. आरक्षणाबाबत माझी मतं फार पराकोटीची आहेत. मी काही बोललो तर पुन्हा उद्या त्यावरून बोंबाबोंब होईल.” यावेळी नानांनी राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नाचंही उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करण्याविषयीची चर्चा होती. याविषयी बोलताना नाना म्हणाले, “राजकारण हा माझा प्रांत नाही. मी तिथे जराही टिकू शकणार नाही. माधुरी दीक्षितचं मला माहीत नाही पण त्या क्षेत्रात मी टिकू शकणार नाही. तुम्ही बाहेर असल्याने तुमची मतं मांडता येतात. तिथे गेल्यानंतर तुमच्या मताला कितपत किंमत असेल मला माहीत नाही.”

हे सुद्धा वाचा

“भाजप छान काम करेल अशी खात्री”

राजकारण या विषयावर बोलताना नाना पाटेकरांनी भाजप पक्षाविषयी मोकळेपण मत मांडलं आहे. “आपण राजकारणाविषयी याठिकाणी बोलू नये, ते एवढ्यासाठी की मग मी फार परखडपणे बोलेन. त्यावरून पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सी होईल. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते, मी कट्टर शिवसेनेचा होतो. आज मला भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते. मला नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा आमचे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात, ते मला आवडतं. ज्या पद्धतीने नितीन गडकरी काम करतात, ते मला आवडतं. कोण काय बोलेल याच्याशी काही घेणंदेणं नसतं. आपल्याला आपलं काम अतिशय इमानानं करता आलं पाहिजे. गडकरी या गोष्टीचं मोठं उदाहरण आहेत. तो माणूस अजातशत्रू आहे. विरोधी पक्षातील मंडळी, त्यांच्या पक्षातली मंडळी.. सगळ्यांनाच ते हवेहवेसे वाटतात. जो कोणी छान काम करतो, त्याला नमस्कार करायचा. फक्त त्याच्याकडे स्वत:साठी वैयक्तिकरित्या काही मागायचं नाही. मग तुमची मैत्री टिकून राहते,” असं ते पुढे म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.