नर्गिसच्या लग्नाच्या दिवशी ढसाढसा रडले कराज कपूर, शेवटच्या क्षणापर्यंत अभिनेत्रीने पाहिली होती वाट
हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस यांची आज जयंती. नर्गिस आणि अभिनेते राज कपूर यांच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा होत्या, मात्र अनेक वर्षानंतरही ते एकत्र येऊ शकले नाहीत.
Nargis Dutt Birth Anniversary : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नर्गिस (Nargis) यांची आज जयंती आहे. नर्गिस यांचा जन्म 1 जून 1929 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांची कामगिरी आजही अनेक अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी आहे. नर्गिस यांना त्यांच्या कामासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. चित्रपट जगताबाहेरही नर्गिसची खूप चर्चा व्हायची. नर्गिस यांचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिले आहे.
हा तो काळ होता जेव्हा नर्गिस यांच्या आयुष्यात राज कपूरचा प्रवेश झाला. या दोघांच्या प्रेमकथेची चर्चा आजही होते. चित्रपटाच्या पडद्यावरून दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली, पण त्याचे खऱ्या आयुष्यात कधी रुपांतर झाले, हे दोघांनाही कळले नाही. राज कपूर नर्गिसच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते. जरी दोघांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम असले तरी ते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. 9 वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही राज कपूर आणि नर्गिस एकमेकांसोबत कायमचे राहू शकले नाहीत.
खरंतर राज कपूर आधीच विवाहित होते. पत्नीला घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करेन, असे आश्वासन राज कपूर यांनी अनकेदा नर्गिस यांना देण्याचा प्रयत्न केला होता. पण वेळ निघून गेली आणि मदर इंडिया चित्रपटानंतर नर्गिसने तिचा को-स्टार सुनील दत्तसोबत लग्न केले. मात्र, नर्गिस शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहत राहिल्याचेही बोलले जात आहे. पण राज कपूर यांनी पत्नीला घटस्फोट दिला नाही.
View this post on Instagram
राज कपूर यांना नर्गिसच्या लग्नाची बातमी कळताच ते ढसाढसा रडले. ते पूर्णपणे तुटले होते. असे मानले जाते की ज्या दिवशी नर्गिसचे लग्न झाले त्या दिवशी राज कपूर बाथटबमध्ये पडून खूप रडले होते. पण राज कपूरला पहिल्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा नव्हता. पहिल्या लग्नापासून त्यांना मुलही झाली होती. त्यांच्या प्रेमापोटी ते बांधले गेले होते. त्यामुळे नर्गिसने सुनील दत्तसोबत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.