AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसीरुद्दीन शाहांच्या मुलाबरोबर 7 वर्ष लिव्ह इन, आता ‘सबा’च्या ऋतिकबरोबर अफेयर्सच्या चर्चा!

ऋतिक रोशन सुझैनबरोबर वेगळं होऊन खूप वर्षे झालीत. आता त्याच्या नव्या अफेयर्सबाबतीत चर्चा सुरु झाल्या आहेत आणि जिच्याबरोबर चर्चा सुरु आहेत ती आहे मिस्ट्री गर्ल सबा आझाद (Saba Azad), जी अभिनयाचे सम्राट नसीरुद्दीन शहा यांचा मुलगा इमाद शाहबरोबर (Imaad Shah) 7 वर्ष लिव्ह इनमध्ये होती...!

नसीरुद्दीन शाहांच्या मुलाबरोबर 7 वर्ष लिव्ह इन, आता 'सबा'च्या ऋतिकबरोबर अफेयर्सच्या चर्चा!
ऋतिक रोशन, सबा आझाद, इमाद शाह
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 12:57 PM

मुंबई : बॉलिवूडचा स्टार ऋतिक रोशन (Hritik Roshan) त्याच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे, वेगळ्या स्टोरीजच्या चित्रपटाने आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चेत असतो. ऋतिक सुझैनबरोबर वेगळं होऊन खूप वर्षे झालीत. आता त्याच्या नव्या अफेयर्सबाबतीत चर्चा सुरु झाल्या आहेत आणि जिच्याबरोबर चर्चा सुरु आहेत ती आहे मिस्ट्री गर्ल सबा आझाद (Saba Azad), जी अभिनयाचे सम्राट नसीरुद्दीन शहा यांचा मुलगा इमाद शाहबरोबर (Imaad Shah) 7 वर्ष लिव्ह इनमध्ये होती…!

ऋतिकबरोबर एका हॉटेलमध्ये जाताना सबा आझाद स्पॉट झाली, तेव्हापासून ऋतिकबरोबर सबाचं नाव जोडलं जाऊ लागलं आहे. त्यांच्या जवळिकतेबाबत नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. ते कधीपासून रिलेशनमध्ये आहेत, याचे अंदाज लावले जात आहेत. पण ज्या सबाच्या ऋतिकबरोबर अफेयर्सच्या चर्चा आहेत, ती नेमकी कोण आहे, तिचं आणि नसीरुद्दीन शाह यांच्या फॅमिलीचं काय कनेक्शन आहे, हे आपण जाणून घेऊयात…!

सबा-इमाद 7 वर्ष लिव्ह इनमध्ये!

इमाद शाह बद्दल बोलायचे तर, तो ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा आहे आणि तो काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला लाईम लाईटपासून दूर राहायला आवडतं. परंतु सबाबरोबरच्या अफेयर्सनी तो अचानक चर्चेत आला. सबा आणि इमाद 7 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले. परंतु त्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

हृतिक-सबाच्या अफेयर्सच्या चर्चा

हृतिक रोशन आणि सबा नुकतेच स्पॉट झाले होते. दोघांनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सबाला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा प्रश्न ती अनेक वेळा टाळताना दिसत होती. आता हे दोघे पुन्हा कधी एकत्र दिसणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

हृतिक रोशनचे आगामी प्रोजेक्ट

हृतिक रोशनच्या 2019 मधील वॉर चित्रपटात दिसला होता. त्यानंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. वॉर चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तो दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे विक्रम वेध आणि फायटर असे आणखी दोन मोठे चित्रपट आहेत.

संबंधित बातम्या

दोन दिवसांवर आलेलं ऑपरेशन पुढं ढकललं, ‘Oo Antava’ गाणं शूट केलं, गणेश आचार्यच्या गाण्यावर सगळा भारत नाचतोय!

माझ्यासोबत ट्रीपला चला, ब्लॅक बिकिनीमधला फोटो पोस्ट करत नोरा फतेहीची चाहत्यांना भन्नाट ऑफर!

Kangana Ranaut : ‘परी म्हणू की सुंदरा’ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पार्टीत कंगनाचा लूक पाहून हेच म्हणाल, पाहा व्हायरल फोटो!

पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त.
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल.
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं...
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं....