पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”

नवज्योत सिंग सिद्धू हे तब्बल पाच वर्षांनंतर कॉमेडी कपिल शर्माच्या शोमध्ये परतले आहेत. कपिलच्या शोच्या आगामी भागाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधल्या त्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसून येत आहेत.

पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले सरदारच पाहिजे..
Archana Puran Singh and Navjot Singh SidhuImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 10:00 AM

पाच वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू हे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोवर परतले आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या शोमध्ये अभिनेत्री अर्चना पूरण सिंह प्रमुख पाहुणी म्हणून दिसली. मात्र आता अचानक तिच्या खुर्चीवर नवज्योत सिंग सिद्धू यांना पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या खास एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे त्यांची पत्नी आणि क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यासोबत पोहोचले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये सिद्धू त्यांच्याच अंदाजात कपिलला म्हणतात, “अब मोटरसायकल नहीं, कार चाहिये, अबे ऑडियन्स सारी कह रही है की सरदार चाहिए (आता मोटरसायकल नको, कार पाहिजे, प्रेक्षक म्हणतायत की आता त्यांना सरदार पाहिजे). आपण शोमध्ये परत यावं अशी मागणी प्रेक्षकांकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे ऐकल्यानंतर कपिल जोरात हसतो. या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांनीही ‘सिद्धूंना परत आणा’ अशी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

2013 मध्ये कलर्स टीव्हीवर जेव्हापासून कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू झाला, तेव्हापासून नवज्योत सिंग सिद्धू या शोचा भाग होते. मात्र 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यावेळी सिद्धू म्हणाले होते, “हे (दहशतवादी हल्ला) भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. हिंसा नेहमीच निषेधार्ह असते आणि ज्यांनी ती केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकता का?” सिद्धूंच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी त्यावेळी ‘द कपिल शर्मा शो’वर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बॉयकॉट सिद्धू’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.