Nawazuddin Siddiqui | बॉलिवूडची काळी बाजू समोर, नवाजुद्दीन सिद्दीकी याचा खळबळजनक खुलासा, ज्युनियर कलाकार असल्याने माझ्यावर…
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्यातील वाद थेट कोर्टात देखील पोहचलाय. मात्र, यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. फक्त चित्रपट नव्हे तर नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमधील वाद (Dispute) हा थेट कोर्टाच जाऊन पोहचला. आलिया हिने काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याने मध्यरात्री आपल्याला मुलांसोबत घराबाहेर काढल्याचे सांगत एक व्हिडीओ शेअर केला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे (Movie) प्रचंड चर्चेत आहे. नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे.
नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढलीये. नवाजुद्दीन सिद्दीकी याने केलेल्या या खुलाश्यांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. टिकू वेड्स शेरूच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी नवाजुद्दीन सिद्दीकी याने चित्रपटाबद्दल बोलत असताना बाॅलिवूडच्या त्याच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल सांगताना मोठा खुलासा केला.
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, ज्युनियर आर्टिस्ट असताना त्याच्या चेहऱ्यावर मेकअप आर्टिस्टने थेट पावडर फेकले होते. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, मला आठवते की मी एका चित्रपटात ज्युनियर कलाकार होतो आणि माझ्यासारखे इतरही काही ज्युनियर कलाकार होते. त्यावेळी आम्हाला एका लाईनमध्ये उभे केले आणि मेकअप आर्टिस्टने आमच्या चेहऱ्यावर पावडर फेकले, मेकअप म्हणून.
अभिनेता पुढे म्हणाला, नेहमीच मेकअप आर्टिस्ट हे आम्हाला एका रांगेत उभे करायचे आणि एकापाठोपाठ एक आमच्या चेहऱ्यावर पावडर फेकले जायचे. खरोखरच तो अत्यंत वाईट अनुभव नक्कीच होता. पावडर चेहऱ्यावर फेकणे झाले की, तो मेकअप आर्टिस्ट थेट म्हणायचा की, झाला तुमचा मेकअप. नवाजुद्दीन सिद्दीकी याने केलेल्या या मोठ्या खुलाश्यामुळे अनेकांना धक्का बसलाय.
नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच एका जाहिरातीमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी हा मोठ्या वादात सापडला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी हा सोशल मीडियावरही सक्रिय असून नेहमीच आपल्या आयुष्यातील घडामोडीवर अपडेट देत असतो. आता नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया ही दुबईला गेल्याचे काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेनेही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप केले होते.