दीपिका पदुकोणची डिलीट केलेली चॅट एनसीबीकडे कशी? WhatsApp कडून खुलासा

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅटसाठी एन्ड टू एन्ड इंक्रिप्शनसारखी प्रायव्हसी सेटिंग असतानाही दीपिकाची चॅट एनसीबीला कशी मिळाली? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता यावर व्हॉट्सअ‍ॅपकडूनच खुलासा आला आहे.

दीपिका पदुकोणची डिलीट केलेली चॅट एनसीबीकडे कशी? WhatsApp कडून खुलासा
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 10:53 PM

मुंबई : सध्या बॉलिवूड (Bollywood) स्टार्सच्या लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सची (Whatsapp Chats) जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुशांत सिंह प्रकरणापासून (Sushant Singh Case) सुरु झाली होती. मात्र, आता ड्रग्ज प्रकरणात याच चॅटवरुन अनेक दिग्गज अभिनेत्रींना एनसीबीने चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणची डिलीट केलेली 2017 ची जुनी चॅट एनसीबीच्या हाती लागली. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅटसाठी एन्ड टू एन्ड इंक्रिप्शनसारखी प्रायव्हसी सेटिंग असतानाही दीपिकाची चॅट एनसीबीला कशी मिळाली? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता यावर व्हॉट्सअ‍ॅपकडूनच खुलासा आला आहे (Deepika Padukone WhatsApp Chat leak and WhatsApp explaination).

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह (Rhea Chakraborty) अनेक लोकांना एनसीबीने अटक केली आहे. त्यानंतरच्या चौकशीत अनेक मोठी नावंही समोर आली आहेत. त्यातच एक जुनी व्हॉट्सअ‍ॅप चॅट देखील एनसीबीच्या हाती लागली. त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सची अडचण वाढली आहे. यात बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणसह (Deepika Padukone) अनेक अभिनेत्रींची नाव आली आहेत. या प्रकरणी एनसीबीने दीपिकाला चौकशीसाठी समन्सही पाठवले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने दावा केला आहे की त्यांची सर्व चॅट एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन (End to end Encrypted) असते. म्हणजेच ही चॅट केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवली त्यालाच वाचता येते. अगदी व्हॉट्सअ‍ॅप देखील ही चॅट वाचू शकत नाही. कारण ही चॅट कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह होत नाही. ती केवळ संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असते. तेथून डिलीट केल्यावर ती कोठेच राहत नाही. मात्र, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि आताच्या ड्रग्ज प्रकरणात व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याची चर्चा सुरु झाल्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसीच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप यावर खुलासा केला आहे.

चॅट लीक कशी होते? व्हॉट्सअ‍ॅपचा खुलासा

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याच्या या चर्चेनंतर तयार झालेल्या संशयास्पद वातावरणात व्हॉट्सअ‍ॅपने लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी चॅट लीक कसे होते याविषयीचा अधिकृत खुलासा केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलंय, “‘एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन’ व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व चॅटला सुरक्षित करते. सेंडर आणि रिसिव्हरशिवाय इतर कुणालाही ही चॅट वाचता येत नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅपवर फोन नंबरचा उपयोग करुन लॉग इन केलं जातं. त्यामुळे स्वतः व्हॉट्सअ‍ॅपला देखील हे मेसेज वाचता येत नाही. व्हॉट्सअ‍ॅपकडून Operating System Manufacturers च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जातं. त्यामुळे चॅट केवळ फोनवरच सेव्ह होते.

चॅट लीक होऊ नये म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने पॉसवर्ड आणि बॉयमेट्रिक ID च्या उपयोगाचा सल्ला दिला आहे. जेणेकरुन फोनवरील चॅट दुसरा कोणताही व्यक्ती वाचू शकणार नाही.

दीपिका पदुकोणची चॅट लीक कशी झाली?

सुशांत सिंह राजपूतची टेलेंट मॅनेजर जया साहासोबत दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माने चॅट केली होती. हीच चॅट NCB च्या हाती लागली. जयाने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा गुगल ड्राईव्हवर (Google Drive) किंवा Apple च्या iCloud वर बॅकअप घेतला होता, असं सांगितलं जात आहे. कोणताही बॅकअप प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपच्या एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन पॉलिसीत येत नाही. अशावेळी तपास संस्था संशयितांचा फोन डाटा दुसऱ्या एखाद्या डिव्हाईसवर कॉपी करतात. त्यासाठी फोन क्लोनिंग तंत्राचा उपयोग होतो. यामुळे बॅकअप चॅट सहजपणे वाचता येते. दीपिकाच्या चॅटविषयी देखील असंच झाल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात, आगामी चित्रपटांमधील कोट्यावधींची गुंतवणूक अडचणीत?

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच

बळीराजाचा रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला आंदोलनाच्या दिवशी चौकशीला बोलावलं : राजू शेट्टी

संबंधित व्हिडीओ :

Deepika Padukone WhatsApp Chat leak and WhatsApp explaination

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.