Bollywood Drugs Case | ड्रग्स प्रकरणात निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने (NCB) निर्माता करण जोहरला समन्स जारी केलं आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

Bollywood Drugs Case | ड्रग्स प्रकरणात निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 10:22 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने (NCB) निर्माता करण जोहरला समन्स जारी केलं आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. याआधी देखील एनसीबीने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स पाठवून चौकशी केलीय. त्यानंतर अनेक कलाकारांच्या अडचणीत वाढही होताना दिसली. त्यामुळे आता यावेळी करण जोहरबाबत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (NCB Summons Producer Karan Johar in Bollywood Drugs Case).

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एनसीबीने बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाललाही समन्स बजावलं होतं. मागील काही दिवसांपासून एनसीबी बॉलिवूडशी असलेल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत आहे. याच प्रकरणात एनसीबीला करण जोहरकडून काही माहिती हवी आहे. ती माहिती मिळवण्यासाठी एनसीबीने करण जोहरला समन्स बजावलं आहे. ही माहिती वकिलामार्फत देणार की स्वतः एनसीबीसमोर उपस्थित राहून देणार हे करण जोहरनेच ठरवायचं आहे.

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. अनेकांची चौकशी झाली आहे. यापैकी काही जणांना एनसीबीने अटकही केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरला या समन्सला उत्तर देण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही. पण करण जोहरने या प्रकरणी एनसीबीला माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे. तपासात अनेक गोष्टींचा खुलासा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळेच यापुढील तपास करण्यासाठी एनसीबीने करण जोहला समन्स पाठवलं आहे.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात 34 जणांना अटक

आतापर्यंत बॉलिवूड प्रकरणात एकूण 34 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी शबाना सईद, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यासारख्या कलाकारांची चौकशी केली आहे.

रियाची सुटका

दरम्यान, तब्बल 3 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर अखेर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता. यावेळीही शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. रिया ड्रग्ज सिंडिकेटची (Drug Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला होता.

दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले होते.

संबंधित बातम्या :

Drugs Case | मेहुणा अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सची सुटका, अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स

NCB Officer Suspended | आरोपींना सहकार्य, तपासादरम्यान संशयास्पद भूमिका, एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर, एनडीपीएस कोर्टाकडून तात्पुरता दिलासा

व्हिडीओ पाहा :

NCB Summons Producer Karan Johar in Bollywood Drugs Case

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.