Love Story | क्रिकेटरने अर्ध्यावर सोडली साथ, लग्नाआधी आई झालेल्या अभिनेत्रीची हृदयद्रावक प्रेमकहाणी

प्रसिद्ध क्रिकेटरच्या लेकीची लग्नाआधी झाली आई, त्याने अर्ध्यावर सोडली साथ, बॉलिवूड अभिनेत्रीची हृदयद्रावक प्रेमकहाणी... आज लेकीसोबत जगतेय आनंदी आयुष्य

Love Story |  क्रिकेटरने अर्ध्यावर सोडली साथ, लग्नाआधी आई झालेल्या अभिनेत्रीची हृदयद्रावक प्रेमकहाणी
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 10:47 AM

मुंबई | आपल्या आवडत्या व्यक्तीकडून प्रेम मिळणं… ही जीवनातील सर्वात चांगली भावना असते. पण त्या भावना आणि ते प्रेम जीवनात अर्ध्यावर सोडून जाणारं असेल तर… एखाद्या व्यक्तीवर प्रेम झाल्यानंतर आपण त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो… ती व्यक्ती आपल्या डोळ्या कधी पाणी येवू देणार नाही अशी समज कायम मनात असते.. पण तीच व्यक्ती सर्वात जास्त दुःख देते… बॉलिवूडमध्ये देखील अशा अनेक लव्हस्टोरी आहेत. ज्या काही कारणांमुळे पूर्ण होवू शकल्या नाहीत. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री यशाच्या शिखरावर चढल्या. सिनेमांमध्ये यश मिळवलं… अभिनेत्रींना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं, पण आवडत्या व्यक्तीकडून मात्र फक्त निराशा.. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता..

नीना गुप्ता त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात फार पुढे गेल्या यश मिळवलं… पण खासगी अयुष्यात मात्र त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. एक काळ होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त नीना गुप्ता यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा रंगल्या होत्या. एककाळ असा होता जेव्हा नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या प्रेमात होत्या.

जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ भारतात क्रिकेट सामने खेळायला आला होता, तेव्हा नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांची ओळख झाली. मुंबईत एका पार्टीत नीना यांची भेट व्हिव्हियन रिचर्ड्सशी झाली. दोघेही पहिल्याच भेटीत मित्र बनले आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघे अनेक वर्ष लिव-इनमध्ये देखील राहत होते. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर नीना गुप्ता प्रेग्नेंट राहिल्या..

हे सुद्धा वाचा

पण व्हिव्हियन रिचर्ड्स विवाहित असल्यामुळे नीना यांची साथ देवू शकले नाहीत. १९८८साली नीना यांनी मुलीला जन्म दिला. नीना यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता असं आहे. मसाबाचा जन्म होताच नीना आणि व्हिव्हियन रिचर्ड्स विभक्त झाले. विवियन विवाहित असल्यामुळे त्यांनी नीना यांच्यासोबत लग्न केलं नाही. त्यांनी नीना यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि बाळाला जन्म देण्याची जबाबदारी नीना यांच्यावर सोपवली.

व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी साथ सोडल्यानंतर नीना यांनी सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला. एवढंच नाहीतर, नीना यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला देखील अनेक मुलींना दिला. अखेर २००८ मध्ये नीना गुप्ता यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं. आज वयाच्या ६४ व्या वर्षी देखील नीना गुप्ता अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. ‘बधाई हो’ सिनेमानंतर ‘पंचायत’ या वेब सीरिजमुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.