नीना गुप्ता यांच्या लग्नाचा फोटो पहिल्यांदाच समोर; लेक मसाबा गुप्ताचीही उपस्थिती

नीना गुप्ता यांनी 2008 मध्ये विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. त्याआधी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत त्यांचं अफेअर जगजाहीर होतं. या दोघांनी कधीच लग्न केलं नव्हतं. मात्र त्यांना मसाबा ही मुलगी आहे. आता बऱ्याच वर्षांनंतर नीना यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

नीना गुप्ता यांच्या लग्नाचा फोटो पहिल्यांदाच समोर; लेक मसाबा गुप्ताचीही उपस्थिती
Neena Gupta and Vivek MehraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 9:42 AM

मुंबई : 17 जानेवारी 2024 | बॉलिवूडमधल्या दमदार अभिनेत्रींमध्ये नीना गुप्ता यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी आजवर अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांसोबतच त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचं अफेअर जगजाहीर होतं. मसाबा गुप्ता ही या दोघांचीच मुलगी आहे. मात्र विवियन यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नव्हतं. मुलगी मोठी झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. या लग्नाचा फोटो त्यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 2008 मध्ये त्यांनी दिल्लीतील चार्टर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांनी या अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या लग्नाची एक झलक दाखवली आहे.

या फोटोमध्ये नीना गुप्ता यांनी लाल रंगाची साडी नेसल्याचं पहायला मिळतंय. त्यांच्या बाजूला विवेक मेहरा बसले आहेत. लग्नाचे विधी सुरु असताना मुलगी मसाबा गुप्ता ही आई-वडिलांच्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असल्याचं दिसतंय. मसाबा ही आता बॉलिवूडमधील अत्यंत प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. ‘माझ्या साध्या लग्नाचा फोटो’ असं कॅप्शन देत नीना यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.

पहा फोटो

हे सुद्धा वाचा

नीना गुप्ता आणि क्रिकेटर सर विवियन रिचर्ड्स यांनी कधी लग्न केलं नाही, कारण विवियन हे आधीच विवाहित होते. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी विवेक मेहरासोबत लग्न केलं. नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता काही महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. या लग्नाला विवियन रिचर्ड्स यांनी खास हजेरी लावली होती.

नीना गुप्ता या जेव्हा अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत एका चित्रपटाचं शूटिंग जयपूरमध्ये करत होत्या, तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्याशी झाली. जयपूरच्या राणीने चित्रपटाच्या टीमला आणि वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला डिनरसाठी आमंत्रित केलं होतं. याचवेळी नीना आणि रिचर्ड्स पहिल्यांदा भेटले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.