Neena Gupta | प्रेग्नंट असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्ता यांनी केला विवियन रिचर्ड्सला कॉल; मिळालं अनपेक्षित उत्तर

मसाबा ही नीना गुप्ता आणि माजी वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं नातं खूप चर्चेत होतं. नीना गुप्ता यांनी एकल मातृत्व स्वीकारत मसाबाला लहानाचं मोठं केलं.

Neena Gupta | प्रेग्नंट असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्ता यांनी केला विवियन रिचर्ड्सला कॉल; मिळालं अनपेक्षित उत्तर
नीना गुप्ता यांनी सांगितली त्या पहिल्या फोन कॉलची आठवण; "जर तुला हे मूल नको असेल.. " Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 1:03 PM

मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होतात. त्यांची मुलगी मसाबा गुप्ता ही नुकतीच विवाहबंधनात अडकली. मसाबा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्याशी तिने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. यावेळी पहिल्यांदाच मसाबाचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. लग्नाच्या या फोटोंमध्ये नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स एकाच फ्रेममध्ये दिसले. मसाबा ही नीना गुप्ता आणि माजी वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं नातं खूप चर्चेत होतं. नीना गुप्ता यांनी एकल मातृत्व स्वीकारत मसाबाला लहानाचं मोठं केलं. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी त्यांच्या गरोदरपणातील काही आठवणी सांगितल्या होत्या. प्रेग्नंट असल्याचं समजल्यावर त्यांनी पहिल्यांदा विवियन रिचर्ड्स यांना फोन केला असता त्यांची काय प्रतिक्रिया होती, याविषयी नीना यांनी सांगितलं.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी आनंदी होते, कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं. मी त्याला फोन केला आणि सांगितलं की जर त्याला हे मूल नको असेल तर मी जन्म देणार नाही. उलट तू या बाळाला जन्म दिलास तर मला आनंद होईल, असं त्याने मला सांगितलं.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

“त्यावेळी प्रत्येकजण मला हेच सांगत होतं की तू एकटी बाळाचा सांभाळ कसा करशील? कारण त्याचं आधीच लग्न झालं होतं आणि मी त्याच्याशी लग्न करून अँटिगॉला राहायला जाऊ शकत नव्हते. तरुणाईत तुम्ही प्रेमात आंधळे असता. तुम्ही जेव्हा प्रेमात असता, तेव्हा तुम्ही कोणाचंच ऐकत नाही. मीसुद्धा तशीच होते”, असं त्या पुढे म्हणाल्या.

नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट

नीना गुप्ता या जेव्हा अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत एका चित्रपटाचं शूटिंग जयपूरमध्ये करत होत्या, तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्याशी झाली. जयपूरच्या राणीने चित्रपटाच्या टीमला आणि वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला डिनरसाठी आमंत्रित केलं होतं. याचवेळी नीना आणि रिचर्ड्स पहिल्यांदा भेटले होते.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.