‘मैं तो पब्लिक प्रॉपर्टी हूं’, असं म्हणत का भडकल्या Neena Gupta?
कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणाऱ्या 'पंचायत 2' फेम नीना गुप्ता कोणाला म्हणाल्या, मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे... त्यांच्या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा.
मुंबई : ‘बधाई हो’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. ‘बधाई हो’ सिनेमानंतर ‘पंचायत २ ‘ (Panchayat 2) वेब सीरिजमध्ये नीना यांनी मंजू भूमिकेला योग्य न्याय दिलं. नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आल्या. आज नीना गुप्ता यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमा आणि सीरिजमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकरल्यानंतर नीना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील नीना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केले आहे. मुंबई येथील नेहरु सेंटरमधील आर्ट फेस्टिवल पाहण्यासाठी नीना गुप्ता पोहोचल्या होत्या. तेव्हा एक व्यक्ती न सांगता नीना यांचे फोटो क्लिक करु लागला तेव्हा नीना गुप्ता यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये नीना गुप्ता म्हणतात, ‘लोक न विचारता माझे फोटो क्लिक करतात. मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे.’ असं म्हणत नीना यांनी संताप व्यक्त केला. सध्या नीना यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, चाहते देखील त्यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
नीना गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर नीना यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतातच. त्यांच्या प्रत्येक पोस्टची चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते.
नीना गुप्ता यांचे सिनेमे ‘बधाई दो, शुभमंगलम सावधान, गुड बाय आणि ऊंचाई’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये नीना गुप्ता यांनी मुख्य भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मोठ्या पडद्यासोबतच नीना यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. ‘पंचायत, मसाबा मसाबा आणि पंचायत 2’ (Panchayat 2) त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.