‘लाज वाटली पाहिजे, तू मोलकरीण…’, जेव्हा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने सुनावले खडेबोल

Love Life : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला बॉयफ्रेंड म्हणाला, 'लाज वाटली पाहिजे, तू मोलकरीण...', दिल्लीतून मुंबईत आलेल्या अभिनेत्रीचं खडतर आयुष्य... अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने केला मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा

'लाज वाटली पाहिजे, तू मोलकरीण...', जेव्हा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने सुनावले खडेबोल
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 11:06 AM

मुंबई| 12 डिसेंबर 2023 : ‘तुला लज वाटली पाहिजे, तू मुंबईत मोलकरीण व्हायला आली आहेस?’ अस खडेबोल बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने सुनावले होते. तुम्हाला देखील आता प्रश्न पडला असेल ‘ही’ अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नीना गुप्ता आहेत. नीना गुप्ता यांनी आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी नीना गुप्ता दिल्ली येथून मुंबईत तेव्हा असलेल्या बॉयफ्रेंडसोबत आल्या होत्या. अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना केल्यानंतर नीना गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं.

नुकताच झालेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी भूतकाळाबद्दल मोठा खुलासा केला आहे. नीना गुप्ता म्हणाल्या, ‘जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मी पृथ्वी कॅफेमध्ये वांग्याचं भरीत बनवायचे. कारण मला तेथे मोफत जेवण मिळायचं. मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत मुंबईत आली होती. एकटी येण्याची हिंमत माझ्यात नव्हती…’

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ‘सुरुवातीला मी कॅफेमध्ये काम करायचे. त्यामुळे मला बॉयफ्रेंड म्हणायचा, ‘तुला लाज वाटली पाहिजे, तू मुंबईत मोलकरीण व्हायला आली आहेस, हे सगळं करायला आली आहेस?… ‘ एवढंच नाही तर नीना गुप्ता यांचा एक्स – बॉयफ्रेंड त्यांच्याकडून सिगारेटसाठी देखील पैसे मागायचा…

हे सुद्धा वाचा

भूतकाळ आठवत नीना गुप्ता म्हणाल्या, ‘ते मी सर्वांना सांगितलं.. मला पैसे मागायला लाज वाटेल, काम मागायला नाही… मी अनेक कामे केली आहेत. फर्शी साफ करण्यापासून भांडी धुण्यापर्यंत मी सर्व कामे केली आहेत. माझ्या घरी स्टाफ नव्हता. आमचं घर देखील आम्ही स्वतःहा साफ करायचो… त्यामुळे काम करायला मला लाज वाटत नाही…’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.

नीना गुप्ता वयाच्या 64 व्या वर्षी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. ‘बधाई हो…’ सिनेमा आणि ‘पंचायत’ या वेब सीरिजमुळे नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. नीना गुप्ता फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कामय चर्चेत असतात.

सोशल मीडियावर देखील नीना गुप्ता यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना गुप्ता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नीना गुप्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.