Neha Dhupia | लग्नाआधी गरोदर झाल्याने नेहा धुपिया तुफान ट्रोल; आता दिलं सडेतोड उत्तर

नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीशी 10 मे 2018 रोजी लग्न केलं. या लग्नाला फक्त मोजके कुटुंबीयच उपस्थित होते. त्यानंतर नेहाने त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. नेहा लग्नाआधी प्रेग्नंट असल्याची गोष्ट अनेकांना पचनी पडली नाही आणि त्यांनी यासाठी तिला ट्रोलही केलं.

Neha Dhupia | लग्नाआधी गरोदर झाल्याने नेहा धुपिया तुफान ट्रोल; आता दिलं सडेतोड उत्तर
Neha Dhupia Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 6:50 PM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या पहिल्या प्रेग्नंसीदरम्यान सोशल मीडियावर तुफान चर्चेत होती. लग्नाआधीच नेही गरोदर राहिल्याने तिच्यावर अनेकांनी टीकासुद्धा केली होती. इतकंच नव्हे तर यामुळे तिला आजही ट्रोल केलं जातं. त्यावर आता नेहाने मोकळेपणे उत्तर दिलं आहे. “आपण सर्वजण कॅन्सल कल्चरचे पीडित आहोत. बहुतांश वेळी आपण सोशल मीडियाचा गैरवापर करतो आणि त्यापैकी सर्वाधिक वेळ अशीच असते जेव्हा तुम्ही इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करता. आम्ही सेलिब्रिटी किंवा पब्लिक फिगर आहोत म्हणून याचा अर्थ असा होत नाही की कोणीही आम्हाला काहीही बोलू शकेल”, असं नेहा म्हणाली.

गरोदरपणावरून झालेल्या ट्रोलिंगविषयी नेहा पुढे म्हणाली, “मला आजही अशा आर्टिकल्समध्ये टॅग केलं जातं, तेव्हा लग्नाआधी गरोदर झालेल्या महिलांचा विषय असतो. कारण कोणीतरी तुमच्या चक्राबद्दल विचित्र गणित करत बसला आहे, जे खरंच विनाकारण आहे. लोक कशा प्रकारचे कॅल्क्युलेशन करतात आणि तुमच्यावर नजर ठेवून असतात, हे समजत नाही. या सर्व गोष्टींना काहीच अर्थ नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीशी 10 मे 2018 रोजी लग्न केलं. या लग्नाला फक्त मोजके कुटुंबीयच उपस्थित होते. त्यानंतर नेहाने त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. नेहा लग्नाआधी प्रेग्नंट असल्याची गोष्ट अनेकांना पचनी पडली नाही आणि त्यांनी यासाठी तिला ट्रोलही केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने आईवडिलांच्या प्रतिक्रियेविषयी खुलासा केला होता.

“मी लग्नाआधी गरोदर होते, म्हणून जेव्हा आम्ही त्याबद्दल माझ्या पालकांना कळवलं, तेव्हा त्यांनी मला फक्त 72 तासांचा वेळ दिला. ते म्हणाले, तुझ्याकडे लग्नासाठी फक्त 72 तास आहेत. मला अडीच दिवसांचा अवधी देण्यात आला जेणेकरून मी मुंबईला जाऊन लग्न करू शकेन. मग आम्ही मुंबईत येऊन लग्न केलं,” असं नेहाने सांगितलं होतं.

नेहानं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्हीच्या दुनियेतून केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नेहानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘कयामत : सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटातून केली. यानंतर ती ‘ज्युली’ चित्रपटात दिसली आणि यामुळे तिला ओळख मिळाली. नेहाने हिंदीसह पंजाबी, तेलगू, मल्याळम अशा अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं एक चालीस की लोकल, चुप चुप के, हेलिकॉप्टर ईला, हिंदी मीडियम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.