Neha Rohanpreet | नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्यामधील वाद टोकाला? ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांना धक्का
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह हे नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह हे दोघे काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. शेवटी यांनी 2020 मध्ये लग्न केले. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह हे सोशल मीडियावर देखील नेहमची सक्रिय असतात.
मुंबई : नेहा कक्कर ही कायमच चर्चेत असते. नेहा कक्कर (Neha Kakkar) ही सोशल मीडियावरही चांगली सक्रिय दिसते. नुकताच 6 जूनला नेहा कक्कर हिचा 35 सावा वाढदिवस पार पडलाय. नेहा कक्कर हिचा वाढदिवस (Birthday) म्हटल्यावर तर धमाकेदार पार्टी तर होणारच होती. नेहा कक्कर हिच्यावर सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत होता. अनेकांनी नेहा कक्कर हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेहा कक्कर हिचे चाहते तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटोची आतुरतेने वाट पाहताना देखील दिसले. शेवटी नेहा कक्कर हिच्या वाढदिवसाचे काही खास फोटो पुढे आले. परंतू नेहा कक्कर हिच्या वाढदिवसाचे फोटो (Photo) पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला.
नेहा कक्कर हिने तिच्या वाढदिवसाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोमध्ये नेहा कक्कर हिचे जवळचे मित्र दिसले. धमाकेदार पार्टी झाल्याचे या फोटोवरून स्पष्ट दिसत आहे. मात्र, वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो पाहून चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी तर थेट नेहा कक्कर हिला अनेक प्रश्न देखील विचारले.
नेहा कक्कर हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये कुठेही तिचा पती आणि गायक रोहनप्रीत सिंह हा दिसत नाही. रोहनप्रीत सिंह हा नेहाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाला नसल्याने आता विविध चर्चा या सुरू झाल्या आहेत. एका युजर्सने नेहा कक्कर हिच्या फोटोवर कमेंट करत थेट म्हटले की, रोहनप्रीत सिंह याचा पत्ता कट झाल्याचे मला दिसत आहे.
दुसऱ्याने लिहिले की, मला वाटते की रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर यांच्यामध्ये काही तरी वाद झाला असावा किंवा यांच्या नात्यामध्ये दरार निर्माण झालीये. अजून एकाने लिहिले की, यार असे कसे शक्य आहे पत्नीच्या वाढदिवसाला पती हजर नाही, नक्कीच दाल में कुछ तो भी काला है…अजून एकाने लिहिले की, रोहनप्रीत सिंह आणि नेहा यांच्यामध्ये सर्वकाही ठिक दिसत नाही.
रोहनप्रीत सिंह हा नेहा कक्कर हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर नसल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. नेहा कक्कर हिने बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंह याच्यासोबत 2020 मध्ये लग्न केले. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये नेहा आणि रोहनप्रीत सिंह यांचे लग्न झाले. लग्नानंतर रोहनप्रीत सिंह हा मुंबईमध्ये शिफ्ट झाला. नेहा आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.