Neha Kakkar-Falguni Pathak: ‘या’ कारणासाठी नेहा-फाल्गुनी एकमेकींशी भांडले? Video पाहून चाहते भडकले

नेहा कक्कर-फाल्गुनी पाठकचं पॅचअप? काय आहे 'या' व्हिडीओमागचं सत्य?

Neha Kakkar-Falguni Pathak: 'या' कारणासाठी नेहा-फाल्गुनी एकमेकींशी भांडले? Video पाहून चाहते भडकले
Falguni Pathak and Neha KakkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 6:36 PM

मुंबई- नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) ही गायनक्षेत्रातील दोन लोकप्रिय नावं गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. ‘मैंने पायल है छनकाई’ या फाल्गुनीच्या गाण्याचा रिमेक नुकताच नेहाने बनवला. मात्र हा रिमेक फारसा कोणाला आवडला नसल्याचं दिसून येतंय. यावरून नेहाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. इतकंच नव्हे तर फाल्गुनीनेही तिची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. हा वाद झाल्यानंतर आता इंडियन आयडॉल 13 च्या (Indian Idol 13) मंचावर फाल्गुनी आणि नेहाला एकत्र पाहिलं गेलंय. यामुळे चाहते चांगलेच पेचात पडले आहेत.

सोनी टीव्हीने नेहा आणि फाल्गुनीच्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रोमोमध्ये इंडियन आयडॉलच्या सेटवर नेही फाल्गुनीचं स्वागत करताना दिसतेय. त्यानंतर फाल्गुनी गरबाचं गाणं गाते आणि नेहासोबत सगळे स्पर्धक दांडिया खेळू लागतात. त्यामुळे वादानंतर नेहा आणि फाल्गुनी यांचं पॅचअप झालं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर काहींनी हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता, असं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

नेहाने गायलेल्या रिमेकच्या व्हिडीओला युट्यूबवर लाइक्सपेक्षा डिस्लाइक्सच जास्त मिळाले. याचा स्क्रिनशॉट शेअर करत फाल्गुनीने तिला डिवचलं होतं. इतकंच नव्हे तर त्या मूळ गाण्याचे हक्क माझ्याकडे नसल्याने मी काहीच करू शकत नाहीये, अशी प्रतिक्रिया तिने चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर नेहानेही पोस्ट लिहित त्यावर भाष्य केलं होतं.

इंडियन आयडॉलचा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर नेहा आणि फाल्गुनी यांच्यातील वाद मिटल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हा एपिसोड वादाच्या खूप आधी शूट करण्यात आला होता. फक्त त्याचा व्हिडीओ आता प्रदर्शित केला जात आहे.

“मी आणखी काय करू शकले असते? मी कायदेशीर कारवाई करू शकत नाही. अनेकांनी सोशल मीडियावर माझ्यासाठी कमेंट्स केल्या आहेत. हे नवीन व्हर्जन आवडलं नसल्याचं अनेकांनी मला सांगितलं. कदाचित मला गाण्याच्या हक्काविषयी त्यावेळी समजलं असतं बरं झालं असतं. स्वत:वर जेव्हा एखादी परिस्थिती ओढवते, तेव्हाच कळतं. गाण्याच्या हक्काबद्दल मला त्यावेळी काहीच माहीत नव्हतं, याचा मला पश्चात्ताप होतो. अन्यथा, मी नक्कीच काहीतरी केलं असतं,” अशी प्रतिक्रिया फाल्गुनीने दिली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.