Indian Idol 12 Update | सवाई भटसोबतच नेहा कक्करही ‘इंडियन आयडॉल’मध्ये गैरहजर! जाणून घ्या कारण…

छोट्या पडद्यावरील सिंगिंग शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) सध्या लोकांचे खूप मनोरंजन करत आहे. या शोचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना आवडला आहे आणि सर्वजण त्याचा खूप आनंद घेत आहेत.

Indian Idol 12 Update | सवाई भटसोबतच नेहा कक्करही ‘इंडियन आयडॉल’मध्ये गैरहजर! जाणून घ्या कारण...
नेहा कक्कर
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 10:47 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील सिंगिंग शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) सध्या लोकांचे खूप मनोरंजन करत आहे. या शोचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना आवडला आहे आणि सर्वजण त्याचा खूप आनंद घेत आहेत. शोमध्ये प्रत्येक आठवड्यात काही खास पाहुणे हजेरी लावत असतात, जे आपले जुने किस्से सांगून प्रत्येकाची मने जिंकतात आणि स्पर्धकांना देखील प्रोत्साहित करतात. या कार्यक्रमाच्या परीक्षक पदाची धुरा नेहा कक्कर (Neha Kakkar), हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी सांभाळत आहेत. प्रत्येक आठवड्यात तिन्ही परीक्षक स्पर्धकांसोबत खूप मजा करतात. परंतु, यावेळी नेहा कक्करच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे (Neha Kakkar will not seen in Indian Idol 12 upcoming episode know the reason).

या आठवड्यात नेहा कक्कर ‘इंडियन आयडॉल 12’चा भाग असणार नाहीय. बाकीच्या कमीटमेंट्समुळे नेहा कक्कर ‘जयाप्रदा स्पेशल’ एपिसोडमध्ये दिसू शकणार नाहीय. खरं तर, नेहा कक्कर इंडियन आयडॉलच्या शूटसाठी आठवड्यातून केवळ एकच दिवस देते. पण कोरोनामुळे निर्मात्यांनी बॅक-टू-बॅक एपिसोड शूट करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे नेहा इतर गोष्टींवर वेळ देऊ शकली नाही. आता नेहा या आठवड्यात जयाप्रदा स्पेशल एपिसोडचा भाग होणार नाहीय.

नेहा कक्कर ‘रामलीला’ ऐकलीच नाही!

गेल्या आठवड्यात इंडियन आयडॉल12 चा ‘राम नवमी’ निमित्त खास भाग होता. ज्यामध्ये बाबा रामदेव पाहुणे म्हणून आले होते. ज्यामध्ये स्पर्धकांनी सर्वांसमोर ‘म्युझिकल रामलीला’ सादर केली. यादरम्यान नेहाने सांगितले की तिने वयाच्या 32व्या वर्षीही म्हणजेच अद्यापही रामलीला ऐकली नव्हती. ती म्हणाली, ‘मला इंडियन आयडॉलच्या स्टेजवर प्रथमच रामलीला ऐकण्याची संधी मिळाली. मी माझ्या बालपणात जागरणात व्यस्त असायचे, आता मी या शोच्या माध्यमातून रामलीला लाईव्ह ऐकणार आहे (Neha Kakkar will not seen in Indian Idol 12 upcoming episode know the reason).

सेटवर रंगते धमाल मस्ती

अलीकडेच नेहा कक्करने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती शोच्या मेकर्सवर रागवत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडीओमध्ये नेहा आपल्या किंग साईज खुर्चीवर बसून ‘बाला बाला’ गाणे गात आहे. यामध्ये एक घोषणा होते, प्रत्येकजण शॉटसाठी सज्ज होतो. या घोषणेमुळे मात्र नेहा वैतागते आणि म्हणते, ‘क्या यार…मस्ती भी नही करणे देते’

रेखाकडून मिळाली अनमोल भेट

लग्नानंतर ‘इंडियन आयडॉल 12’ हा नेहा कक्करचा पहिलाच रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये नेहाला लग्नानंतर प्रथमच भेटलेल्या अनेक दिग्गज कलाकारांनी तिचे तोंड भरून कौतुक केले आहे. या शोमध्ये अनेक कलाकार नेहाला लग्नाचा शगुन देताना दिसले होते. अलीकडेच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या देखील शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांनी नेहाला शगुन म्हणून सुंदर साडी गिफ्ट केली.

(Neha Kakkar will not seen in Indian Idol 12 upcoming episode know the reason)

हेही वाचा :

Indian Idol 12 | पवनदीप-आशिषला कोरोना, आता सवाई भटची प्रकृती ढासळली, मध्यातच सोडला शो!

PHOTO | केवळ 100 रुपयांसाठी करायची पेट्रोलपंपावर काम, आता बॉलिवूडची ‘फॅशन दिवा’ म्हणून ओळखली जाते मराठमोळी अभिनेत्री!

‘कोरोनापेक्षाही भयंकर कीड म्हणजे राजकारण’, अभिनेत्री तेजस्विनी पंडित संतापली!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.