Ravindra Mahajani | ‘ते एकटेच राहत होते, त्यांना कोणी भेटायला येत…’, रवींद्र महाजनींचे शेजारी हैराण

रवींद्र महाजनी यांचे शेजारी आणि कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या महिलेने अभिनेत्याच्या शेवटच्या क्षणांबद्दल दिली महत्त्वाची माहिती..., सध्या सर्वत्र रवींद्र महाजनी यांच्या निधनाची चर्चा...

Ravindra Mahajani | 'ते एकटेच राहत होते, त्यांना कोणी भेटायला येत...', रवींद्र महाजनींचे शेजारी हैराण
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 2:54 PM

पुणे | मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी रवींद्र महाजनी यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांचं निधन का झालं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. फक्त चाहतेच नाही तर, संपूर्ण सिनेविश्वाला रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी पुण्यात एकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रवींद्र महाजनी यांचं निधन शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

रवींद्र महाजनी राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या शेजाऱ्यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. आपल्या शेजारी रवींद्र महाजनी यांच्यासारखे प्रसिद्ध अभिनेते राहत होते… हे देखील कोणाला माहिती नव्हतं. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

रवींद्र महाजनी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून एकटे राहत होते. एवढंच नाही तर, त्यांना कोणी भेटायला देखील येत नव्हतं. अशी माहिती रवींद्र महाजनी यांच्या शेराजी राहणाऱ्या प्राजक्ता पुजारी यांनी दिली आहे. एवढंच नाही तर कचरा गोळा करणाऱ्या महिलेने देखील महत्त्वाची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या आदीका वारिंगे यांची मंगळवारी रवींद्र महाजनी यांच्यासोबत भेट झाली होती. कचरा गोळा करण्यासाठी यायचे तेव्हा त्यांच्यासोबत बोलणं व्हायचं. ते कायम बाळा – बाळा म्हणून हाक मारयचे… असं वक्तव्य आदीका यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र रवींद्र महाजनी यांच्या निधनाची चर्चा रंगत आहे.

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. महाजनी यांच्या मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानंतर पोलिसांनी याबद्दलची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

गश्मीर तळेगाव दाभाडेला पोहोचल्यानंतर महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यावर अद्याप गश्मीरची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. गश्मीरची आई आजारी असल्याने त्यांना याबद्दल अद्याप सांगण्यात आलं नाही. त्यामुळे महाजनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे पार पडतील, हे देखील अद्याप निश्चित नसल्याची माहिती समोर येत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.