Nepal Plane Crash: ‘जर विमान क्रॅश झालं तर..’; मैत्रिणीला मेसेज केल्यानंतर ‘रसना गर्ल’ने विमान अपघातात गमावला जीव

या विमानात तरुणी तिची आई गीता सचदेव यांच्यासोबत प्रवास करत होती. आपली मुलगी आणि पत्नी गमावलेल्या हरिश सचदेव यांना जेव्हा नेपाळ विमान दुर्घटनेविषयी समजलं, तेव्हा त्यांच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या.

Nepal Plane Crash: 'जर विमान क्रॅश झालं तर..'; मैत्रिणीला मेसेज केल्यानंतर 'रसना गर्ल'ने विमान अपघातात गमावला जीव
'रसना गर्ल' तरुणी सचदेवImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 7:54 AM

मुंबई: नेपाळमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. मात्र नेपाळमधील अशी दुर्घटना घडल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही नेपाळच्या जॉमसम परिसरात 2012 मध्ये एक विमान क्रॅश झालं होतं. या अपघातात भारताची प्रसिद्ध बालकलाकार तरुणी सचदेवने आपले प्राण गमावले होते. या विमानात तरुणी तिची आई गीता सचदेव यांच्यासोबत प्रवास करत होती. आपली मुलगी आणि पत्नी गमावलेल्या हरिश सचदेव यांना जेव्हा नेपाळ विमान दुर्घटनेविषयी समजलं, तेव्हा त्यांच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “जेव्हा मी विमान अपघाताची बातमी ऐकली, तेव्हा माझा राग पुन्हा अनावर झाला. अजूनही अशा घटना घडत आहेत. अशा दुर्घटनेत किती जणांनी आपले प्राण गमावले आणि आणखी किती लोकांचे प्राण त्यांना घ्यायचे आहेत. त्यांची विमानंच खूप जुनी आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी ते इतरांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. माझी मुलीने आणि पत्नीनेसुद्धा अशाच दुर्घटनेत आपला जीव गमावला होता. आजही मला अशा घटनांबद्दल समजल्यावर मन अस्वस्थ होतं. या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाला मी समजू शकतो.”

‘रसना गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणीसोबत घडलेल्या दुर्घटनेविषयी ते पुढे म्हणाले, “मी तेव्हा मुंबईत होतो आणि माझी पत्नी मुलीसह नेपाळला गेले होते. माझ्या मुलीचं तिथे जायचं अजिबात मन नव्हतं. तिला गोव्याला फिरायला जायचं होतं. तिने मला म्हटलं की, बाबा आपण गोव्याला जाऊयात आणि तिथे मी पॅराग्लायडिंग करेन. माझी पत्नी तिच्या टीमसोबत दर्शनासाठी नेपाळला जात होती, त्यामुळे तिने मुलीलाही सोबत नेलं. कदाचित माझ्या मुलीला त्या अपघाताची चुणूक लागली होती की काहीतरी वाईट घडणार आहे. विमानात चढताच तिने तिच्या एका मैत्रिणीला मेसेज केला होता की, जर विमान क्रॅश झाला तर मी सांगू इच्छिते की.. आय लव्ह यू.”

हे सुद्धा वाचा

विमान अपघातानंतर बचावकार्यादरम्यान पत्नीचं बरंचसं सामान चोरीला गेल्याचंही त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर त्यांचं सामान आणि मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांना नेपाळमध्ये बरंच भटकावं लागलं होतं. तरुणी आणि तिच्या आईच्या निधनानंतर नेपाळ सरकारकडून त्यांना सात लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळाले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.