
Bobby Deol net worth: अभिनेता बॉबी देओल याने अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉबी देओल याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून बॉबू मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण 2023 अभिनेत्यासाठी फार खास ठरला. कारण Animal सिनेमामुळे बॉबी देओल याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. सिनेमात खलनायकाची भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
सध्या बॉबी देओल याच्याकडे कोणता सिनेमा नाही. अभिनेत्याने दाक्षिणात्य सिनेविश्वात अधिक काम केलं आहे. आज अभिनेत्याचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र बॉबी देओल याची चर्चा रंगली आहे. अभिनेता 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचं फिटनेस पाहून त्याच्या वयावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे.
बॉलिवूडमध्ये करियर करत असताना बॉबी देओल याने तान्य आहूजा हिच्यासोबत लग्न केलं. बॉबी आणि तान्या यांना दोन मुलं देखील आहेत. तान्याच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींचा ग्लॅमर देखील फिका आहे. तान्यबद्दल सांगायचं झालं तर, ती एक यशश्वी उद्येजिका आहे.
तान्या एक प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आहे. मुंबईत तिचं स्वतःचं फर्निचर स्टोर देखील आहे. तान्हा ही करोडपती उद्योजक देवेंद्र आहूजा यांची लेक आहे. देवेंद्र आहुजा यांनी लकीसाठी 300 कोटी रुपयांची संपत्ती आणि काही शेअर सोडून गेले आहेत. तान्या हिच्या वडिलांचं निधन 2010 मध्ये झालं.
बॉबी देओल याच्या नेटवर्थ बद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे 66.7 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ‘ॲनिमल’ सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमामुळे बॉबी देओल याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये देखील मोठी वाढ झाली. ‘ॲनिमल’ सिनेमातील अभिनेत्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आणि बॉबी देओल याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. चाहत्यांनी बॉबी देओल याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर, अभिनेत्याने मात्र पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.