एप्रिल ते जून या कालावधीत तब्बल 9 लाख 70 हजार सबस्क्रायबर्स गमावल्याचं Netflix Inc ने मंगळवारी सांगितलं. सबस्क्रायबर्सची (subscribers) घटती संख्या नेटफ्लिक्ससमोर चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सला प्रतिस्पर्धांकडून मोठ्या प्रमाणात धोबीपछाड मिळत आहेत. भारतीय बाजारात नेटफ्लिक्सची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होत आहे. पुढील वर्षी जाहिरात-समर्थित टियर (ad-supported tier) लॉन्च करण्याची योजना त्यांनी आखली असून मजबूत डॉलरचा फटका परदेशातील सबस्क्रायबर्सकडून बुक केलेल्या कमाईलादेखील होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
चालू तिमाहीत नेटफ्लिक्स जवळपास दोन दशलक्ष ग्राहक गमावण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. तर दुसऱ्या तिमाहीत सबस्क्रायबर्समध्ये इतकी घसरण नसेल असं म्हटलं जात आहे. नेटफ्लिक्सने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 1 दशलक्ष सबस्क्रायबर्स जोडण्याचा अंदाज व्यक्त केला. Refinitiv द्वारे केलेल्या सर्वेक्षणनुसार वॉल स्ट्रीट विश्लेषकांना 1.84 दशलक्ष सबस्क्रायर्सची अपेक्षा होती. वॉल्ट डिस्ने को, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि ॲपल इंक यांच्या स्वत:च्या स्ट्रीमिंग सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यानंतर नेटफ्लिक्सच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
Our watchlist for the rest of this month? It’s looking Great, Man ? pic.twitter.com/qQAZM3X19e
— Netflix India (@NetflixIndia) July 16, 2022
भागधारकांना लिहिलेल्या पत्रात नेटफ्लिक्सने सांगितलं की पासवर्ड शेअरिंग, स्पर्धा आणि सुस्त अर्थव्यवस्था यांसह विविध घटकांमुळे व्यवसायात घसरण होत आहे. नेटफ्लिक्सचे जगभरात जवळपास 221 दशलक्ष सशुल्क सबस्क्रायबर्स आहेत. गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सने मायक्रोसॉफ्ट कॉर्पची जाहिरात-समर्थित ऑफरसाठी तंत्रज्ञान आणि विक्री भागीदार म्हणून घोषणा केली. यूएस डॉलरमुळे महसुलावर प्रभाव झाल्याचं नेटफ्लिक्सचं म्हटलं आहे.