कोटींचा घोटाळा केलेल्या मुलीच्या जीवनावर कथा बनवण्यासाठी नेटफ्लिक्‍स ने दिले लाखो डॉलरची ऑफर!

अन्‍ना च्या जीवनावर एक चित्रपट बनविण्यासाठी नेटफ्लिक्‍स (Netflix) हिला 3 लाख 20 हजार डॉलर इतकी किंमत दिली.अन्नाचा जन्म एका सर्वसामान्य घरांमध्ये झाला आणि गरीबीमुळे तिला खूप हाल पेक्षा सहन करायला लागल्या. लहानपणी जी मुलगी शिक्षकांसोबत बोलताना सुद्धा अडखळत आणि घाबरायची.

कोटींचा घोटाळा केलेल्या मुलीच्या जीवनावर कथा बनवण्यासाठी नेटफ्लिक्‍स ने दिले लाखो डॉलरची ऑफर!
Inventing Anna Netflix Series
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 12:12 AM

मुंबई : अन्‍ना डेल्‍वी उर्फ अन्‍ना सोरोकिनची (Anna Sorokin) कथा कोणत्याही एका थ्रिलर कादंबरीच्या प्लॉट (Threelar story) पेक्षा कमी नाही. 1991 मध्ये दक्षिण मॉस्कोमधील एका निम्न-मध्यम-वर्गीय कामगार कुटुंबात जन्मलेली, हुशार मुलगी. हीचे वडील ट्रक ड्रायवर होते आणि आई एक छोटेसे जनरल स्टोअर चालवत असे नंतर आई ह्या पूर्ण वेळ गृहिणी म्हणून काम सांभाळू लागल्या.अन्‍ना च्या जीवनावर एक चित्रपट बनविण्यासाठी नेटफ्लिक्‍स (Netflix) हिला 3 लाख 20 हजार डॉलर इतकी किंमत दिली.अन्नाचा जन्म एका सर्वसामान्य घरांमध्ये झाला आणि गरीबीमुळे तिला खूप हाल पेक्षा सहन करायला लागल्या. लहानपणी जी मुलगी शिक्षकांसोबत बोलताना सुद्धा अडखळत आणि घाबरायची.

एक दिवस त्याच मुलीने अमेरिकेत राहून मोठ्या मोठ्या श्रीमंत व्यक्तींना आणि ताकदवान लोकांना चुना लावला. सर्वांना एक विश्वास दिला की ती एका श्रीमंत व समृद्ध कुटुंबातील आहे त्याच बरोबर राजेशाही तिच्या रक्तातच आहे असा देखील विश्वास आणि अनेकांचा मनामध्ये निर्माण केला त्याच बरोबर ती स्वतः एक चालते फिरते श्रीमंताचा मुकुट आहे असे सुद्धा तिने वर्णन करून अनेकांना फसवले आणि म्हणूनच मोठे मोठे बुद्धिमान व्यक्ती सुद्धा तिच्या जाळ्यात अडकले. मग एक दिवशी या मुलीवर जगातील सर्वात शक्तिशाली असलेला देश व त्या देशातील न्यायालयामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा केल्याबद्दलची सुनावणी दाखल करण्यात आली. या प्रकरणांमध्ये ज्या काही सुनावण्या झाल्या त्या स्वतः एक कथा आहेत.आपले कपडे आणि फॅशन बद्दल ती इतकी सावध होती की यासाठी तिने वकिलांना सांगून एक स्पेशल उच्चभ्रु पद्धतीचा फॅशन डिझायनर बोलावला होता. जो प्रत्येक सुनावणीच्या वेळी तिच्या साठी स्पेशल फॅशनेबल आऊटफिट तयार कररायचा. एकदा न्यायाधीशांन सांगितले सुद्धा होते की अन्ना सोरोकिन हिला कोर्ट प्रकरण यापेक्षा आपले कपडे आणि फॅशनची चिंता जास्त आहे.

ती खोटे बोलण्यामध्ये माहिर होती!

अन्‍ना सोरोकिन अशी होती की जिच्या खिशात एक दमडी पैसा नसून सुद्धा ती न्‍यूयॉर्क मधील श्रीमंत, फॅशन डिझायनर, सोशलाइट्स तसेच अनेक बँकांना हिने खात्री करून दिली होती की, ती जर्मनीच्या एका अब्जोपतीच्या संपत्तीची एकुलती एक वारस आहे. अन्ना सनी सर्वसामान्य व गरीब कुटुंबांमध्ये जन्माला आली असली तरी ती बुद्धिवान होती. तिला अनेक भाषा ज्ञात होत्या व या बुद्धीच्या जोरावर तिने अनेक मोठ्या मोठ्या श्रीमंतांना आपल्या जाळ्यामध्ये फसवले होते तसेच ती खोटे बोलण्यामध्ये माहिर होती.

ती लोकांना कशी इम्प्रेस करायची?

अन्ना लंडन आणि पॅरिस मध्ये काही वेळ राहिली होती तर यु एस मध्ये एका फॅशन मॅगझिन सोबत तिने काही काळ काम केलं परंतु न्यूयॉर्क ला गेल्यावर तिथे पहिल्यांदाच तेथील लोकांशी मैत्री करण्यास तिला जास्त मेहनत करावी लागली नाही. तिकडच्या लोकांना तिने सहजच आपल्या बुद्धिमत्तेने आणि चतुर वाणीने फसवले होते तसेच जर्मनीमध्ये स्वतःच्या नावावर 60 मिलियन डॉलर ट्रस्ट आहे, असे सांगून ती लोकांना इम्प्रेस करत होती. तिला असे वाटत होते कि न्यूयॉर्क मध्ये राहिल्याने ही जागा आपल्या कामासाठी अतिशय उत्तम आहे

अनेक श्रीमंतांनी तिच्यावर पैसे उधळले!

अन्‍ना सोरोकिन ने न्‍यूयॉर्क मध्ये एक आर्ट हाउस क्‍लब उघडण्याच्या नावावर अनेक श्रीमंतांना फसवले. तिच्या या प्रोजेक्टमध्ये आपल्या क्षेत्रांमध्ये अव्वल असणाऱ्या बेस्ट लोकांनी तिच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शवली. तिच्या टीममध्ये असा एक व्यक्ती होता, ज्याने व त्याच्या परिवाराने वर्ल्ड ट्रेड सेंटरचे आर्किटेक डिझाईन केले होते. तिच्या टीम मध्ये कोणताही सदस्य हा सर्वसामान्य नव्हता. प्रत्येक सदस्य हा मोठा श्रीमंत आणि बुद्धिवंत होता आणि या सर्वांनी अन्‍नावर मोठ्या विश्वासाने सहमतीने सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला होता. त्याचबरोबर या मुलीने असे सांगितले होते की, जेव्हा ती 25 वर्षाची होईल तेव्हा संपूर्ण संपत्ती तिच्या नावावर होईल. म्हणून सर्व श्रीमंतांनी तिच्यावर पैसे उधळले. परंतु तिने एकही रुपया त्यांना परत केला नाही.

‘हाउ अन्‍ना डेल्‍वी ट्रिक्‍ड न्‍यूयॉर्क पार्टी पीपुल’

अन्‍ना ने केलेला हा घोटाळा खूप दिवसापर्यंत चालला. परंतु एक दिवस हा घोटाळा बाहेर येणारच होता. जेव्हा अन्‍नाचा हा घोटाळा बाहेर आला तेव्हा न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर केस दाखल करण्यात आली. जेव्हा सुनावणीची बातमी आली तेव्हा न्यूयॉर्क मॅगझिनची पत्रकार जेसिका प्रेस्‍लर ला या मुलीची कहाणी खूपच गंमतिशिर वाटली.

जेसिका ने अन्‍ना सोरोकिनची कथा शोधण्यास सुरुवात केली अनेक महिन्यांनंतर आणि अनेक लोकांचे इंटरव्यू केल्यानंतर न्यूयॉर्क मॅगझिनमध्ये एक स्टोरी छापली गेली आणि या स्टोरीचे शीर्षक होते ‘हाउ अन्‍ना डेल्‍वी ट्रिक्‍ड न्‍यूयॉर्क पार्टी पीपुल’. नेटफ्लिक्‍स वरील सीरीज इनवेन्टिंग अन्‍ना सुद्धा याच स्टोरीवर आधारित आहे. अन्‍नाच्या जीवनावर कथा बनवण्यासाठीचे हक्क विकत घेण्यासाठी नेटफ्लिक्स ने तीन लाख 20 हजार डॉलर दिले. यातील एक हिस्सा तिला लोकांमध्ये वाटावा लागला. ज्यांना अन्‍ना ने फसवले होते आता अमेरिका तिला जर्मनी डिपोर्ट करण्याची तयारी करत आहे.

इतर बातम्या :

Farhan-Shibani Wedding : महाराष्ट्रीय रिवाजानुसार लगीनगाठ बांधणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर

Tv9 Public Poll: प्रत्येक वेळेस बाईनच घर का सोडावं? अरूंधती जोगळेकरनं देशमुखांचं घर सोडावं? जनतेचाच कौल वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.