In Real Love | नेटफ्लिक्सच्या शोमध्ये हंगामा; संमतीशिवाय किस केल्याचा स्पर्धकाचा आरोप

या संपूर्ण घटनेवर वीरेंद्रनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "तू कितीही नशेत असलीस तरी त्या क्षणी तुझा मूड स्विंग होऊ शकत नाही आणि अचानक तुझे शब्द बदलू शकत नाही. त्या क्षणी तू विशिष्ट मूडमध्ये होतीस आणि तुझी देहबोली एका विशिष्ट प्रकारची होती."

In Real Love | नेटफ्लिक्सच्या शोमध्ये हंगामा; संमतीशिवाय किस केल्याचा स्पर्धकाचा आरोप
Sakshi GuptaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 12:47 PM

मुंबई : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘इन रियल लव्ह’ हा शो सुरू झाला आहे. रणविजय सिंघा आणि गौहर खान या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. पारंपरिक डेटिंग आणि ऑनलाइन डेटिंगमधील फरक – समानता यांविषयीचा हा शो आहे. या शोचा चौथा एपिसोड सध्या चर्चेत आला आहे. एका स्पर्धकाने संमतीशिवाय किस केल्याच आरोप महिला स्पर्धकाने केला आहे. साक्षी गुप्ता असं या महिला स्पर्धकाचं नाव आहे. शोमधील ‘कनेक्शन’नुसार स्पर्धकांच्या जोड्या बनवल्या जातात. त्यानुसार साक्षीचा जोडीदार वीरेंद्र होता. हे दोघं डेट गेले असताना वीरेंद्रने साक्षीला किस केल्याचं सांगितलं होतं.

आदल्या दिवशी पूल पार्टीत वीरेंद्रने साक्षीच्या खांद्यावर किस केलं होतं. त्यावर साक्षी आश्चर्यचकीत झाली आणि ही घटना आठवत नसल्याचं म्हणाली. साक्षीने सुरुवातीला सांगितलं होतं की तिने मद्यपान केलं होतं. त्यामुळे तिला किसिंगच्या घटनेविषयी कोणतीच आठवण नाही. नंतर तिने या घटनेचा विरोध केला.

हे सुद्धा वाचा

“तू मला चुकीचा समजू नकोस. पण कधी कधी तू बळजबरी करतोस आणि ते चुकीचं आहे. हे संभाषण दोन्ही बाजूंनी झालं पाहिजे. तू माझा बॉयफ्रेंड आहेस असा हक्क जेव्हा मी तुला देईन, तेव्हा तू मला किस करणं योग्य असेल. अन्यथा तू असं काहीच करणार नाहीस”, असं साक्षी बजावते.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

इतर स्पर्धकांशी बोलताना साक्षी पुढे म्हणते, “मला खूप वाईट वाटलं. त्याने मला पूलमध्ये असताना काहीतरी सांगितलं होतं. मी माझ्या शुद्धीत नव्हते आणि त्याने मला किस केलं. त्याने हे कधी केलं, तेसुद्धा माझ्या लक्षात नाही.” तो किस दोघांच्या संमतीनेच होता असं जेव्हा वीरेंद्र म्हणतो, तेव्हा ती आणखी भडकते. “माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणत्याच भावना नाहीत”, असं ती म्हणते.

या संपूर्ण घटनेवर वीरेंद्रनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “तू कितीही नशेत असलीस तरी त्या क्षणी तुझा मूड स्विंग होऊ शकत नाही आणि अचानक तुझे शब्द बदलू शकत नाही. त्या क्षणी तू विशिष्ट मूडमध्ये होतीस आणि तुझी देहबोली एका विशिष्ट प्रकारची होती. एखादी गोष्ट घडल्यानंतर तू अचानक कशी काय शुद्धीवर येतेस. या सगळ्यात मी विकृत असल्यासारखा दिसत आहे.” वीरेंद्रनेही राग व्यक्त केल्यानंतर शोमधील या दोघांचं कनेक्शन तुटतं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.