जया बच्चन यांना नेटकऱ्यांचा सल्ला; नीतू कपूर यांच्याकडून शिकावी ‘ही’ खास गोष्ट

नीतू कपूर यांचा Video पाहून नेटकऱ्यांना का आली जया बच्चन यांची आठवण?

जया बच्चन यांना नेटकऱ्यांचा सल्ला; नीतू कपूर यांच्याकडून शिकावी 'ही' खास गोष्ट
Jaya Bachchan and Neetu KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 5:32 PM

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचे पापाराझींसोबतचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी त्या पापाराझींसोबत गप्पा मारत असतात, तर कधी त्यांच्या प्रश्नांची मजेशीर उत्तरं देताना पहायला मिळतात. नीतू कपूर या नुकत्याच आजी झाल्या. सून आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्याची गुड न्यूज त्यांनी पापाराझींसोबतही आनंदाने शेअर केली. हेच व्हिडीओ पाहून फोटोग्राफर्सशी कसं वागायचं हे जया बच्चन यांनी नीतूजींकडून शिकलं पाहिजे, असा सल्ला काही नेटकरी देत आहेत.

“जया बच्चन यांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे”, अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘नीतू कपूर अत्यंत शांतपणे बोलतात, मात्र जया बच्चन नेहमीच भडकलेल्या दिसतात.’ पापाराझींनी नीतू कपूर यांना आलिया भट्ट आणि तिच्या मुलीविषयी प्रश्न विचारत असतात. त्यावर त्या अत्यंत संयमाने त्यांना उत्तर देत असतात. हे पाहून नेटकरी प्रभावित झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘फोटोग्राफर्स आणि पत्रकारांशी त्या खूप नम्रतेने वागतात. आलिया आणि तिच्या मुलीबद्दल जाणून घेण्यासाठी लोक किती उत्सुक आहेत, हे नीतूजींना ठाऊक आहे’, असंही एकाने लिहिलं. कॉमेडियन मुनव्वर फारूखीनेही या व्हिडीओवर कमेंट केली. ‘पापाराझींसोबत त्या खूप चांगल्या बोलत आहेत. त्यातील एकजण जखमी झाला होता आणि आता पुन्हा कामावर आल्याचंही त्यांना लक्षात आहे. नीतूजींसाठी मनात खूप आदर आहे’, असं त्याने लिहिलं.

नीतू कपूर यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध जया बच्चन वागताना दिसतात. फोटोग्राफर्स आणि पापाराझींसमोर त्या नेहमीच चिडलेल्या दिसतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जया बच्चन यांचे फोटो काढताना एक फोटोग्राफर धडपडतो. त्यावर जया त्याला म्हणतात, “बरं झालं, तू पडलाच पाहिजेस.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्यावर खूप टीका केली.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.