‘सूर नवा ध्यास नवा’चे पाचवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, याठिकाणी होणार ऑडिशन्स

| Updated on: May 22, 2022 | 8:00 AM

कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये 29 मेपासून ऑडिशन्सची फेरी रंगणार आहे. याकरीता वयोगट 15 ते 35 असणार आहे. या ऑडिशनमधून निवडल्या जाणाऱ्या निवडक स्पर्धकांसोबत सुरांचं हे अद्वितीय पर्व रंगणार आहे.

सूर नवा ध्यास नवाचे पाचवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, याठिकाणी होणार ऑडिशन्स
Sur Nava Dhyas Nava
Image Credit source: Tv9
Follow us on

महाराष्ट्रातील सूरवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा ‘सूर नवा ध्यास नवा’चा (Sur Nava Dhyas Nava) रंगमंच सज्ज झाला आहे. कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर गाण्यांची मैफल पुन्हा सजणार आहे, सुरांशी पुन्हा मैत्री होणार आहे, वाद्य आणि सूरांच्या जोडीने पुन्हा संगीताचा सुरेल नजराणा महाराष्ट्रातील प्रेक्षक अनुभवणार आहेत. अजूनही प्रत्येक पर्वात सुरवीरांनी सादर केलेली गाणी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातून या कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळालं. म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या चार पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर आता कार्यक्रमाचं पाचवं पर्व (Fifth Season) प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास मेपासून सुरु होणार आहे.

कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये 29 मेपासून ऑडिशन्सची फेरी रंगणार आहे. याकरीता वयोगट 15 ते 35 असणार आहे. या ऑडिशनमधून निवडल्या जाणाऱ्या निवडक स्पर्धकांसोबत सुरांचं हे अद्वितीय पर्व रंगणार आहे. या अनोख्या पर्वात सुप्रसिध्द गायक, संगीतकार आणि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे हे सुरवीरांना मार्गदर्शन करतील. या सुरेल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

ऑडिशन्ससाठी स्थळ आणि तारीख

29 मे रविवार (पुणे)
पी. जोग हायस्कूल, ५७, छत्रपती राजाराम महाराज पथ, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे – 411029
वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4

31 मे मंगळवार (औरंगाबाद)
देवगिरी महाविद्यालय, न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद – 431005
वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4

3 जून शुक्रवार (कोल्हापूर)
गायन समाज देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012
वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4

5 जून रविवार (मुंबई) – साने गुरुजी विद्यालय
भिकोबा पाठारे मार्ग, कॅटरिंग कॉलेज जवळ, दादर (पश्चिम), मुंबई – 400028
वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4