Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस विरोधात नवे समन्स जारी ‘ काय आहे मनी लाँड्रिंग प्रकरण
मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचे नाव समोर आल्यापासून अभिनेत्री अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीची 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर 2021 रोजी चौकशीही करण्यात आली होती. यादरम्यान अभिनेत्रीने चंद्रशेखरकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. विचार आहे.सुकेश चंद्रशेखर हा
मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) विरोधात नवे समन्स जारी केले आहे. जारी करण्यात आलेल्या समन्सनुसार, अभिनेत्रीला आता 14 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात यापूर्वी जारी केलेल्या समन्सनुसार अभिनेत्रीला(actress) 12 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे अभिनेत्रीने नियोजित तारखेला उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त करत पोलिसांकडे दुसरी तारीख मागितली होती. यानुसार दिल्ली पोलिसांच्या(Police) आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची सोमवारी होणारी चौकशी पुढे ढकलली होती. तसेच या संदर्भात जॅकलिनला आणखी एक समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. खरं तर, अभिनेत्रीने ईमेलद्वारे दिल्ली पोलिसांना कळवले होते की आधीच केलेल्या काही नियोजनामुळे ती 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या तपासात उपस्थित राहू शकणार नाही, त्यानंतर तिने नवीन तारखेची मागणीही केली होती.
या कारणासाठी समन्स
सुकेश चंद्रशेखर यांच्या कथित 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्रीचा समावेश असल्याने अभिनेत्रीला समन्स बजावण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या चार्जशीटमध्ये जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात ठेवले होते. जॅकलिनला सुकेशचा गुन्हेगारी खटल्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती होती, असेही ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतरही तिने सुकेशच्या गुन्हेगारी नोंदीकडे दुर्लक्ष करून आर्थिक व्यवहार केले.
Delhi Police issues a fresh summon to Jacqueline Fernandez to appear on 14 September. Delhi Police postponed their questioning scheduled on Monday as the actor cited prior commitments & asked for another date. However, she was asked to join the investigation on September 14. pic.twitter.com/sHu4SCNshu
— ANI (@ANI) September 12, 2022
मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचे नाव समोर आल्यापासून अभिनेत्री अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीची 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर 2021 रोजी चौकशीही करण्यात आली होती. यादरम्यान अभिनेत्रीने चंद्रशेखरकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. विचार आहे.सुकेश चंद्रशेखर हा मूळचा कर्नाटकातील बेंगळुरूचा रहिवासी असून तो सध्या दिल्लीच्या तुरुंगात बंद असून त्याच्यावर १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. रोहिणी तुरुंगात असताना चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे.