निक्की तांबोळीकडून पुन्हा एकदा जान कुमार सानूचा अपमान; म्हणाली…
कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोची बहुचर्चित स्पर्धक अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli) नेहमीच चर्चेत असते.
मुंबई : कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोची बहुचर्चित स्पर्धक अभिनेत्री निक्की तांबोली (Nikki Tamboli) नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस घरात असताना निक्की तांबोळी आणि जान कुमार सानूचे नाव जोडले गेले होते आणि बऱ्याच दिवसांपासून निक्की आणि जान रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती. मात्र, या चर्चेवर निक्कीने काही महिण्यांपूर्वी सांगितले होते की, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. (Nikki Tamboli’s big statement about Jaan Kumar Sanu)
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतमध्ये निक्की तांबोळी जानच्या आणि तिच्या रिलेशनवर म्हणाली की, मला जान आवडत नाही. तो फक्त माझा मित्र आहे. मला स्ट्रॉग आणि स्पष्ट बोलणारी मुले आवडतात. मुळात म्हणजे जान माझ्या टाईपचा नाहीये. निक्की पुढे म्हणाली की, जान खूप स्वीट आहे यात काही शंका नाही पण मला जानची पर्सनालिटी आवडत नाही. मात्र, जान माझा चांगला मित्र आहे.
बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी जानला भाईजान म्हणून त्रास देत असे, तरीही जानने अनेकवेळा शोमध्ये सांगितले आहे की, निक्की आवडते. बिग बॉसमध्ये असताना एकदा निक्कीने जानवर गंभीर आरोप केला होता. निक्कीचे म्हणणे होते की, तिच्या परवानगी शिवाय जानने तिच्या गालावर किस केले होते. त्यानंतर बिग बॉसच्या घरात आणि बाहेरही मोठा हंगामा बघायला मिळाला होता.
निक्कीने दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्री एक वेगळी ओळख निर्माण केली असून तिने ‘कंचना 3’ (Kanchana 3), ‘चिकती गदिलो चितकोतुडु’ आणि ‘थिप्पारा मीसम’ अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. निक्कीने बिग बॉस 14 चे सीझन संपल्यानंतर एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, बिग बॉस 14 च्या घरातील तिचा प्रवास म्हणावा तेवढा सोप्पा नव्हता कारण बिग बॉसच्या घरात तिचे कोणी मित्र-मैत्रिण नव्हते आणि ती कोणालाही ओळखत नव्हती. त्यानंतर निक्की आणि रूबीनाची चांगली मैत्री झाली.
संबंधित बातम्या :
Birth Anniversary: मोठ्या पडद्यावरील कजाग सासू, प्रेमळ आई… एक होत्या ललिता पवार; वाचा संपूर्ण प्रवास
(Nikki Tamboli’s big statement about Jaan Kumar Sanu)