Satish Kaushik यांची ‘ही’ होती शेवटी इच्छा शेवटची इच्छा?

अभिनेते सतीश कौशिक यांच्य अचानक निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. सतीश यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत, आता पुतण्याने त्यांची शेवटची इच्छा देखील सांगितली आहे.

Satish Kaushik यांची 'ही' होती शेवटी इच्छा शेवटची इच्छा?
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 12:20 PM

मुंबई : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अखेरचा श्वास घेतला. सतीश यांच्या अंत्यसंस्कराची प्रक्रिया त्यांच्या पुतण्याचे पूर्ण केली आहे. अभिनेते सतीश कौशिक यांचा पुतण्याने निशांत कौशिक यांने त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काकांच्या निधनानंतर खुद्द निशांत त्यांची शेवटीची इच्छा पूर्ण करणार आहे. एका मुलाखतीत निशांत कौशिक याने सतीश कौशिक यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र सतीश यांच्या शेवटच्या इच्छेची चर्चा रंगत आहे.

निशांत म्हणाला, स्वतःचा एक भव्य स्टुडीओ असावा अशी सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा होती. आता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर निशांत अभिनेते अनुपम खेर आणि बोनी कपूर यांच्या मदतीने भव्य स्टुडीओची स्थापना करणार आहेत. सतीश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.

सतीश कौशिक यांची १० वर्षांची मुलगी वंशिका कौशिक पूर्णपणे कोलमडली आहे. घरी आलेल्या पाहुण्यासोबत देखील वंशिका बोलत नाही.. अशी माहिती सतीश कौशिक यांचा पुतण्या निशांत याने दिली आहे. सध्या सर्वत्र सतीश कौशिक यांची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

सतीश कौशिक यांनी सिनेविश्वात तीन दशक मोलाचं योगदान दिलं. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत त्यांनी काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इकती आहे. अभिनयातून सतीश कौशिक यांनी कोट्यवधींचं संपत्ती कमावली आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंब मात्र दुःखात आहे.

फार्म हाऊसमध्ये पार्टी झाल्यानंतर सतीश कौशिक यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. आता सतीश यांच्या निधनानंतर दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत.

अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सतीश याचं निधन नाही तर हत्या झाल्याचा दावा सन्वी मालू यांनी केला आहे. सान्वी मालू अभिनेते सतीश कौशिक यांचे मित्र विकास मालू यांच्या पत्नी आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी सान्वी यांनी पती विकास मालू यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आता या प्रकरणी काय समोर येणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.